पाण्यात शिकार शोधण्यासाठी भटकणारी मगर कधी कुणावर हल्ला करेल, याचा नेम नाही. रानावनात संचार करणारे वन्यप्राणी तहानेनं व्याकूळ झाल्यावर पाणी पिण्यासाठी नदी किनाऱ्यावर येत असतात.
एका नदीकाठी हत्तींचा कळप पाणी पिण्यासाठी येतो. पण पाण्यात असलेल्या मगरीचा त्यांना अंदाजही येत नाही. त्यामुळे शिकारीसाटी टपून बसलेली मगर पाण्यात असलेल्या हत्तीणीवर हल्ला करते. पाण्यात त्या हत्तीणीचा पिल्लाही असतो. त्यामुळे हत्तीण मगरीने हल्ला केल्यानंतर तिच्यावर आक्रमकपणे तुटून करते. जेणेकरुन तिच्या हल्ल्यापासून पिल्लूला वाचवता येईल. हत्तीण आणि मगरीमध्ये झालेली झुंज व्हिडीओत दिसत आहे. भल्या मोठ्या हत्तीवर हल्ला करणं मगरीच्या चांगलंच अंगलट आलं. हत्तीणीने सोंडीने धरून मगरीला पाण्यात तुडवलं. काही काळानंतर मगरीचा मृत्यू झाला असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.



