शहरातील सिध्दी विनायक हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत घुले यांच्या सहकार्याने टिफिन बॉक्स मित्र मंडळाच्या वतीने गंगापूर शहरातील भोळ्या स्वभावाचा दादासाहेब चोरमारे यांच्या हाताच्या बोटामध्ये अनेक
दिवसापासून ती बोटाच्या आत घुसली होती त्यामुळे हात खराब होण्याची शक्यता होती टिफिन बॉक्स मित्रमंडळाच्या वतीने दादा चोरमारे यांच्या घरी भेट दिली
असता त्याच्या घरची परिस्थिती आई ने सांगितले याच्या बोटातली अंगठी काढली पाहिजे म्हणून डॉ.आबासाहेब शिरसाट, मनोज पुंडेकर ,योगेश कुरकुटे, दीपक कुलकर्णी ,मंगेश जोशी, योगेश आव्हाळे सर, रोहित जाधव ,सागर पारे ,तूशांत पठाडे,
या सर्व सहकार्यांनी घेऊन सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत घुले यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर डॉ.प्रशांत घुले यांनी विनामूल्य दादा चोरमारे यांची वैद्यकीय सेवा केली व त्याच्या होणाऱ्या त्रासापासून त्याला मुक्त केल्याबद्दल डॉ.प्रशांत घुले यांचे टिफिन बॉक्स मित्र मंडळाचे वतीने मनःपूर्वक धन्यवाद.



