👁 113 Views

आमदार अभिजीत (आबा) पाटील यांचे ४३ व्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल कारखान्यावर रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर संपन्न

आमदार अभिजीत (आबा) पाटील यांचे ४३ व्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल कारखान्यावर रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर संपन्न

पंढरपूर, दि.०३। श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांचे ४३ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. त्यापैकी दि.०३.०८.२०२६ रोजी रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीर श्री विठ्ठल सह. साखर कारखाना, स्वामी समर्थ ब्लड बैंक पंढरपूर, पंढरपूर ब्लड बैंक पंढरपूर व बजाज रक्तपेड़ी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यामाने रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीराचे उ‌द्घाटन डॉ. मदन क्षिरसागर, डॉ. ऋतुजा बेडगे मॅडम यांचे शुभहस्ते व कारखान्याचे संचालक व कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रसंगी १४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर श्री विठ्ठल सह. साखर कारखाना व विठाई मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल पंंढरपूर, मंगलज्योती नेत्रालय पंढरपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे, उपकेंद्र गुरसाळे पाचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे शिबीर यशस्वी होणेसाठी डॉ. ऋतुजा पेटगे नेत्रचिकीत्सक, डॉ. सचिन गुटाळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे सर्व स्टाफ व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले. या शिबीरामध्ये २७७ रुग्णांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध समाजोयोगी उपक्रम राबविले जातात त्यामध्ये दि.०१.०८.२०२६ रोजी श्री विठूल प्राथमिक शाळा, वेणूनगर येथील बालवाडी ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना खाऊ, गणवेश व शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण व श्री नागन्नाथ मुकबधीर विद्यालय बाभुळगांव येथील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन असे कार्यक्रम घेण्यात आले असून दि.०३.०८.२०२६ रोजी रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी यांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. मदनजी क्षिरसागर बोलताना म्हणाले की, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करुन एक उत्कृष्ठ उपक्रम आपण राबवित आहात. आमदार अभिजीत आबांना अशीच आपली सेवा करणेसाठी त्यांना बळ मिळून त्यांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

संचालक श्री तुकाराम मस्के सर म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. पंढरपूर तालुक्यामध्ये ५ वर्षामध्ये १ लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावर १०,००० वृक्षांची लागवड केली आहे. कर्मचा-यांचे आरोग्यही महत्वाचे असल्याने त्यांच्याही वैद्यकीय तपासणी केल्या जातात, आमदार अभिजीत आबांचे जीवन सर्वसामान्य माणसांसाठी समर्पित व्हावे, असे बोलून त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

सदर प्रसंगी डॉ. गुटाळ म्हणाले की, श्री विठ्ठल सह. साखर कारखाना व विठाई मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल पंढरपुर, मंगलज्योती नेत्रालय पंढरपूर व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गुरसाळे यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान, नेत्ररोग तपासणी, उपचार व मोफत चष्मे वाटप शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून याचा सर्वानी लाभ घ्यावा, तसेच कारखान्याचे सर्व कामगारांना हेल्थकार्ड देणेत येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

सुत्र संचालन श्री आर्वे सर यांनी केले तर आभार श्री नागटिळक सर यांनी मानले.

सदर कार्यक्रमास स्वामी समर्थ ब्लड बैंक पंढरपूरचे श्री किरण कदम, पंढरपुर ब्लड बॅंक पंढरपूर श्री संतोष उपाध्ये व बजाज रक्तपेढी पंढरपूर श्री किरण धोंगडे, कारखान्याचे संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, धनंजय काळे, कालिदास साळुंखे, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, ठेकेदार व हितचिलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *