![]()
पंंढरपूर लाईव्ह न्यूज : कर्मयोगी विद्यानिकेतन या शाळेने पुन्हा एकदा गुणवत्तेची उंच भरारी घेत SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) मूल्यांकनामध्ये “अ+ श्रेणी” प्राप्त करून पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे.
ही मानाची कामगिरी प्राप्त करणारी पंढरपूरमधील एकमेव शाळा ठरल्याने शहरात सर्वत्र आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे शाळेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांचे दूरदर्शी नेतृत्व, सर्व शिक्षकवृंदांचे अथक परिश्रम, शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचे एकत्रित योगदान आहे.
•गुणवत्तापूर्ण शिक्षण
•नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम
• स्वच्छ, सुंदर व सुसज्ज •शैक्षणिक वातावरण
•विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
या सर्व घटकांमुळेच शाळेला “अ+” मानांकनाचा मान मिळाला आहे.
प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी सांगितले की, “ही कामगिरी संपूर्ण कर्मयोगी परिवाराच्या एकजुटीचे फलित आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
पंढरपूरसाठी हा खरोखरच एक सुवर्णक्षण असून, शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्मयोगी विद्यानिकेतन परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!!

