पंढरपूर दि.13 :- पंढरपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक अनोळखी पुरुश मयत झाला आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे .
अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 35 वर्षे असून , उंची 170 से.मी, अंगाने सडपातळ, रंग काळा-सावळा, केस काळे, चेहरा उभट, नाक सरळ, अंगावर काळ्या रंगाची पांढऱ्या पट्ट्याची ट्रॅक पॅन्ट व काळ्या रंगाचा टी शर्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे. संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे .
बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन


