👁 4 Views

सोलापूर युवतीसेना आणि युवासेना यांनी एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस केला “कॉमन मॅन डे”म्हणून साजरा….

सोलापूर युवतीसेना आणि युवासेना यांनी एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस केला “कॉमन मॅन डे”म्हणून साजरा….


महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवतीसेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य तथा सोलापूर माढा लोकसभा अध्यक्ष प्रियंकाताई परांडे आणि युवासेना जिल्हाप्रमुख गणेशजी जाधव यांच्यावतीने हा दिवस सर्वसामान्य व्यक्तींचे सत्कार करून “कॉमन मॅन डे”म्हणून साजरा करण्यात आला.
पंढरपूर तालुका प्रमुख स्नेहाताई चवरे,सागर सलगर यांचे विशेष सहकार्य लाभले.


कार्यकारणी सदस्या प्रियांका परांडे यांच्या भीमा साखर कारखाना टा.सिकंदर येथील नजीक असणाऱ्या संपर्क कार्यालया चया ठिकाणी अनेक महिला,युवती ,शेतकरी,व्यवसायिक यांचे सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जाधव यांनी केले.महिलांनीही मनोगते व्यक्त केली तसेच प्रियांका ताई यांनी महिलांना शिवसेना पक्ष तसेच शिंदे साहेबांच्या कार्याची माहिती सांगितली.आपण सदैव महिलांच्या युवकांच्या पाठीशी असू असे सांगितले.


सर्वच स्तरातून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पुळुज चे धनंजय देशमुख ,बंडू बाबर,प्रमोद बाबर ,टाकळी येथील विश्वास वसेकर,हनुमंत डोंगरे,तारापूर विकास शिंदे,पप्पू घोडके औंडी,पुलुजवाडी सिद्राम मदने,योगेश मदने,समाधान मदने तसेच आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,कॉलेज च्या युवती उपस्थित होत्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *