सोलापूर; येडशी ते बार्शी रोडवर रविकिरण रवींद्र शिंदे (वय २४, रा. चिंचोली, ता. बार्शी) व सुरज पांडुरंग माळी (वय १९, रा. पागरी, ता. बार्शी) या दुचाकीवरील दोघांचा ३ डिसेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला होता.
या प्रकरणी भरधाव वेगाने जाणारी दुचाकी स्लिप होऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. पण, त्या दोघांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली आणि त्यात हे दोन तरुण ठार झाल्याची फिर्याद रवीकिरणचा चुलता दत्तात्रेय प्रभाकर शिंदे यांनी पांगरी पोलिसांत दिली आहे.
त्यावरून आता पोलिस त्या वाहनांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पडताळले, पण त्यात नेमके काहीच हाती लागलेले नाही. त्या दोन्ही तरुणांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाल्याचेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिस हवालदार गणेश दळवी करीत आहेत.


