👁 4 Views

प्रेमभंगानं नैराश्यात गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या १९ वर्षीय मुलानं केली आत्महत्या …..

प्रेमभंगानं नैराश्यात गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या १९ वर्षीय मुलानं केली आत्महत्या …..

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या १९ वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऋषिकेश कोकणे असं १९ वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.

पुण्यातील पोलीस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.

अधिकची माहिती अशी की, पुण्यातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाच्या १९ वर्षीय मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याचे आई वडील घरात नसताना ऋषिकेश कोकणे याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांना एक व्हिडीओ सापडला आहे. त्यावरून प्रेमभंग झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाजीनगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

तरुण मुलाच्या जाण्यामुळे पोलिस कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *