अथणी : शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे जात असलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने तो ठार झाला.
तंगडी (ता. अथणी) येथे ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. अनिरुद्ध भानुदास पाटील (वय ११) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, अनिरुद्ध हा शाळा सुटल्यावर घराकडे सायकलने जात असताना उसाने भरलेला ट्रॅक्टर अचानकपणे अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला
नंदगाव येथून ऊस भरलेला ट्रॅक्टर अथणी मार्गावरून उगारकडे जात होती. मुलगा शाळा सुटून घराकडे सायकलवर जात होता. यावेळी मागून ट्रॅक्टर चालकाने त्याच्या सायकलला मागून धडक दिल्याने चाकाखाली सापडला.
ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे. घटनास्थळी अथणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. शासकीय दवाखान्यांमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अथणी पोलिसात गुन्हा नोंद आहे.


