👁 4 Views

बार्शीत भरदिवसा सव्वा लाखाचा ऐवज लंपास……

बार्शीत भरदिवसा सव्वा लाखाचा ऐवज लंपास……

बार्शी: शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेल्या शिवाजीनगर भागातील अहिल्यादेवी उद्यानासमोर राहणाऱ्या विधिज्ञाच्या कार्यालयात भरदिवसा दोघांनी घुसून लॅपटॉप व रोख १४ हजार रुपये असा १ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अज्ञात दोन तरुणांविरोधात नागराज शिंदे (रा. गुलमोहर बंगला) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शनिवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडली. दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

घराच्या दुसऱ्या मजल्यावर शिंदे यांचे कार्यालय असून वैयक्तिक कामासाठी कार्यालय उघडे ठेकून तळ मजल्यावर ते आले होते. नंतर गेले असता लॅपटॉप व खिशातील पैसे चोरी झाल्याचे समजले. सीसीटीव्हीमध्ये तपासणी केली असता दोन युवक गेटमधून प्रवेश करताना, जिना चढताना तसेच लॅपटॉप, इतर सामान घेऊन जाताना दिसत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *