सोलापूर: चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोलापूर- विजयापूर महामार्गावर घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
विजयकुमार रेवणसिद्धप्पा, अभिषेक सावंत आणि राजू बिरादर अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण विजयपूर येथील राहणारे होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. ही अपघाताची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून घरी विजयपूरकडे जात असताना कन्नळ क्रॉस जवळ अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला जाऊन आदळली. या अपघातात विजयकुमार रेवणसिद्धप्पा, अभिषेक सावंत आणि राजू बिरादर यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जखमीवर विजयपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा पुढील तपास विजयपूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.


