👁 5 Views

सांगली: नशेच्या इंजेक्शन्सचे पुन्हा जिल्हा रॅकेट उघडकीस

सांगली: नशेच्या इंजेक्शन्सचे पुन्हा जिल्हा रॅकेट उघडकीस

मिरज: नशेसाठी वापरण्यात येणार्‍या इंजेक्शन्सचा साठा प्रकरणातील वितरकांचे आता आंतरजिल्हा रॅकेट उघडकीस आले आहे. महात्मा गांधी पोलिसांनी छापेमारी केली असून काही संशयित ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आहेत. दरम्यान, सांगली शहरातील काही संशयितांचीही चौकशी करण्यात आली आहे.

मेफेनटर्माइन इंजेक्शन्स, गोळ्यांचा साठा व विक्री करणार्‍या तिघांकडे पोलिस कसून चौकशी सुरू आहे. शरीरसौष्ठवासाठी याचा वापर प्रामुख्याने केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. नशेखोरीविरोधात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. वैद्यकीय वापरासाठी असलेल्या इंजेक्शनचा वापर बेकायदेशीरीत्या नशा करण्यासाठी होत असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली.

त्यानुसार मिरजेतील एका उद्यानाच्या मागील बाजूस नशेसाठी वापरण्यात येणार्‍या औषधांची बेकायदा विक्री करण्यासाठी दोघे आले. तसेच मेडिकल चालकासही ताब्यात घेतले. त्याची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असतानाच शेजारच्या जिल्ह्यातील काही संशयित एजंटांची नावे समोर आली आहेत. महात्मा गांधी पोलिसांनी छापेमारी केली असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *