👁 5 Views

भरदिवसा ,घराचे कुलूप तोडून सुमारे बारा लाखाची चोरी

भरदिवसा ,घराचे कुलूप तोडून सुमारे बारा लाखाची चोरी

कुर्डू – शेतातील मका विकून आलेले रोख पैसे व घरातील सोने, अंदाजे १२ लाख रुपयाच्यावर रक्कम अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून भर दिवसा डल्ला मारल्याची घटना अंबाड, ता. माढा येथे शुक्रवारी १० जानेवारी रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान युवराज हनुमंत कदम (कदम वस्ती) यांच्या येथे घडली.

याबाबत युवराज कदम यांनी दिलेल्या माहितीवरून, कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील लगत असलेल्या कदम वस्तीवरील घराला कुलूप लावून शेतामध्ये सर्वजण काम करत होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कोयंडा तोडून घरातील शेतातील मका विकून आलेली रोख रक्कम दोन लाख 55 हजार व सुमारे 13 तोळे सोने असा ऐवज अज्ञात तीन चोरटयांनी नेल्याचे सांगितले.

हे चोरटे युनीकॉन या गाडीवरून आले होते. तिघापैकी एक जण बाहेर लक्ष ठेवून होता. चोरी करून ते पिंपळनेरच्या दिशेने पळून गेले असल्याचे सांगण्यात आले. ही घटना युवराजचे चुलत भाऊ आदित्य कदम यांनी पाहिले असून, त्यांनी युवराज यांना फोन केला.

घराकडे कोणीतरी येत आहे. हे लक्षात येताच पिंपळनेरच्या दिशेने पोबारा केला असल्याचे सांगितले. रोडलगत असणारे सीसीटीव्हि तपासले असता स्नेहल मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये तोंडाला बांधून तिघे गाडीवर जाताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ञसह धाव घेतली असून, पुढील तपास करीत आहेत. गेल्या दोन दिवसात कुर्डुवाडी, कुर्डू, अंबड, परिसरात दिवसा घर फोडण्याची आठवी वेळ असल्याची तपास पत्रकातील एकाने सांगितले.

यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *