👁 12 Views

11 दुचाकीसह पंढरपूर शहर व तालुक्यातील मोटारसायकल चोरटयांना पोलिसांनी घेतले ताब्यात..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16  september  2017
11 दुचाकीसह पंढरपूर शहर व तालुक्यातील मोटारसायकल चोरटयांना पोलिसांनी घेतले ताब्यात..!

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार नामदेव बबन चुनाडे (रा . अनिल नगर पंढरपूर ) आणि त्याचा साथीदार धनाजी मधुकर नागटिळक (रा . कौठाळी ता. पंढरपूर ) हे दोघे दुचाकी चोरून त्या सोलापूरमध्ये विकत असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या 11 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या. आज  शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी या दोघांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने  त्यांना १८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .

पंढरपूर शहर पोलिस  गुन्हे शाखेला मिळलेल्या माहिती नुसार १५ सप्टेंबर रोजी रात्री धनाजी मधुकर नागटिळक याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या नामदेव चुनाडे हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले . पोलिसांनी यानंतर तातडीने चुनाडेलाही ताब्यात घेतले.

यानंतर या दोन आरोपींनी  चोरी करुन लपवून ठेवलेल्या ११ दुचाकी पोलिसानां मिळुन आल्या आहेत.  फलटण , सातारा , सांगोला , लातुर , अहमदनगर येथून या दुचाकी चोरल्याचे समोर येत आहे.

पोलिसांच्या केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलिस अधिक्षक  विरेश प्रभू, उपविभागीय पोलिस अधिकारी   निखील पिंगळे व पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्टिव्ह ब्रांचचे सपोनि चंद्रकांत गोसावी आणि त्यांच्या गुन्हे शाखेतील पोलिसांनी केली आहे . सपोनि गोसावी व त्यांच्या विभागातील पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *