- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16 september 2017
पंढरपूर: दि.१६- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयाच्या हेल्थ सेंटर, महिला विकास केंद्र, प्राणीशास्त्र विभाग व
सौ. सरजुबाई बन्सीलाल बजाज रक्तपेढी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
महाविद्यालयातील मुलींसाठी शारिरीक तपासणी शिबिराचे आयोजन
करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तगट, हिमोग्लोबिनचे प्रमाण,
उंची, वजन व बी.एम.आय. या घटकांची तपासणी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव व महाविद्यालयाच्या
आरोग्य अधिकारी डॉ. सौ विद्या बेणारे यांनी आहार व आरोग्याचे महत्व
विषद केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी बहुसंखेने
सहभागी झाल्या. यावेळी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन.
तंटक, डॉ. एम.टी. बचुटे, डॉ. विकास कदम. डॉ. एफ.एस. विजापुरे, डॉ.
एम.एम. जडल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. डॉ. ए.बी.
ममलाय्या, प्रा. डॉ. ए.एल. शेख, प्रा. कु. एस.के. पवार, प्रा. ए.एन. देडे,
प्रा. ए.ए. कोष्टी, प्रा. कु. पी.डी. घाडगे, प्रा. कु. एस.एन. चौगुले, श्री.
आर.आर. व्हटकर, श्री. आर.टी. निंबाळकर व श्री. प्रवीण भोईर यांनी
विशेष परिश्रम घेतले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

