👁 12 Views

बडुर ग्रामपंचायतीच्या अंधाधुंध कामाच्या चौकशीसाठी संविधान दुगाने ची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे धाव…4 व्या वित्त आयोगाची रक्कम हडप केल्याचा ग्रामसेवकावर आरोप!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 21 september  2017 


बिलोली – वैभव घाटे
      बिलोली तालुक्यातील मौजे बडुर येथे 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी आलेला निधी व राजस्व स्त्रोतामध्ये वाढ करण्याच्या हेतूने मिळविण्यात आलेला कर आणि त्यातून झालेला खर्च यामध्ये खूप मोठी तफावत असून यात लाखो रुपयांचा घोळ असल्याचा आरोप वारणेचा वाघ संघटनेचे संस्थापक सचिव संविधान दुगाने यांनी केला आहे.
   माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये बडुरचे ग्रामसेवक एस.बी मठमवाड यांच्या कडे कलम 6 (9 ) नुसार दि.14जुलै 2017 रोजी अर्ज केला होता यात त्यांनी 14 व्या वित्त आयोगाचा एकूण निधी खर्च व शिल्लक राशि या बद्दल माहिती मागितली होती.परंतु एक महीना उलटूनही त्यांनी माहिती दिली नव्हती.तद्नंतर जनअपिलिय अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला.आणि 20/9/17रोजी पंचायत विभाग बिलोली येथे ठेवण्यात आलेल्या सुनावणीअंती ही अर्धवट माहिती एकदम खराब हस्ताक्षरात प्राप्त झाली.
    यात 7 लाख 82 हजार 745 रुपये केवळ दीवाबत्ती व पाणि पुरवट्यासाठी खर्च झाल्याचे दाखवले आहे.लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सदरील कामात झाला आहे.या भ्रष्ट कामांमुळे गावच्या राज्य कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून या गंभीर बाबींची तात्काळ चौकशी करून संबधीत ग्रामसेवक श्री.एस.बी मठमवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी संविधान दुगाने यांनी नांदेड जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.यात त्यांनी तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *