👁 13 Views

कॅनडाचा पैसा घ्या.. पण पंढरपूरचा ‘मुळ ढाचा’ बदलण्याचा प्रयत्न केलात तर कदापी सहन करणार नाही-गणेश अंकुशराव

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 26 september  2017 

पंढरपूर (प्रतिनिधी) ः- पंढरपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यावधींचा निधी येतो; आत्तापर्यंत शे-दोनशे कोटीचा निधी खर्चही झाल्याचे समजते परंतु विकासाच्या नावाने अद्यापही ‘बोंब’च आहे. आता तर काय कॅनडा सरकारकडून दोन हजार कोटी रुपये पंढरपूरच्या विकासासाठी मिळणार असून येत्या 3 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात पंढरपूरमध्ये मिटींग असल्याची माहिती मिळतेय. ‘‘कॅनडाचा पैसा घ्या… पण जर है पैसे मिळाल्यानंतर पंढरपूर शहरातील जुनी घरे पाडून त्याजागी गगनचुंबी टॉवर्स उभारुन आधुनिकतेच्या नावाखाली आजच्या पंढरपूरचा पुरातन ढाचा बदलण्याचा प्रयत्न झाला तर ते आम्ही कदापीही सहन करणार नाही.’’ असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
जे 2000 कोटी रुपये मिळणार आहेत ते कॅनडा सरकारकडून व्याजाने मिळणार आहेत असंही समजतंय. जर एवढी मोठी रक्कम व्याजाने कॅनडा सरकार देत असेल तर त्या रक्कमेच्या बदल्यात पंढरपूर शहरालाच या सरकारच्या ताब्यात तर दिले जाणार नाही ना? असा प्रश्‍न आम्हाला पडलाय..! एवढी मोठी रक्कम व्याजाने घेऊन नेमका पंढरीचा कसला ‘विकास’ साधणार आहे महाराष्ट्र शासन? या शहराला विदेशातील शहरासारखे चकाचक अन् झगमगीत करायचेय का? आणि यासाठी शहरातील नागरिकांच्या स्वत:च्या मालकीच्या वास्तु आणि जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत काय? पंढरपूरकरांना शहराबाहेर काढले जाईल काय? असे अनेक प्रश्‍न सर्वसामान्य पंढरपूरकरांना सतावत आहेत.
मागील काळात रस्ता रुंदीकरणासाठी अनेक उत्तम स्थितीमधील पुरातन वाडे जमीनदोस्त करण्यात आले. पंढरीच्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरासोबतच या शहरातील इतर पुरातन मंदिरे, वाडे व कांही वास्तु या आपला एक आगळा-वेगळा ऐतिहासिक समृध्द वारसा जपून आहेत. पंढरीच्या विकासाच्या नावाखाली या शहरातील अंतर्गत बदलाचे संकेत आम्हाला मिळत आहेत. 200 कोटी रुपये जे विकासासाठी मिळणार आहेत त्यातून शहराला जोडणारे रस्ते मोठे करा, शहरामधील नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत सर्वसामान्य वारकर्‍यांसाठी व पंढरपूरकरांसाठी  सोयी-सुविधा निर्माण करा, चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करा पण या शहरातील समृध्द वारशाला किंचित जरी धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर ते पंढरपूरकरांसोबतच आम्हीसुध्दा खपवून घेणार नाही.
कॅनडा सरकारच्या प्रतिनिधीशी येत्या 3 ऑक्टोबरच्या मंदिर समिती अध्यक्षांच्या मिटींगनंतर हा निधी कसा आणि किती मिळणार याबाबत सत्य काय ते समजेलच. परंतु जर हा निधी कर्जाच्या रुपाने मिळणार असेल तर एवढी मोठी रक्कम कर्ज म्हणून घेताना त्यासाठी ‘तारण’ काय ठेवलंय? या निधीद्वारे शहराचा विकास कसा आणि कुठल्या कंत्राटदारांमार्फत होणार आहे? या प्रश्‍नाची उत्तरे आम्हाला मिळायलाच हवीत. या निधीद्वारे जर पंढरपूरकरांच्या स्वायत्तेला आणि स्वातंत्र्याला धक्का बसणार असेल तर ही बाब आम्ही कदापीही सहन करणार नाही. जर असं कांही घडणार असल्याचे निदर्शनास आले तर महर्षी वाल्मिकी संघाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *