👁 10 Views

पंढरपूर शहरातील हॉस्पिटल व सोनोग्राफी केंद्राची तपासणी तपासणीकामी 4 पथके नियुक्त – प्रांतधिकारी -डॉ.विजय देशमुख

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 25 september  2017 

पंढरपूर दि. 26 –गर्भधारणा व प्रसवपुर्व निदान  तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची अमंलबजावणी होण्यासाठी  शहरातील  हॉस्पिटल  व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्यात आली. या तपासाणी कामी चार स्वतंत्र्य पथके नेमण्यात आली असल्याची माहिती प्रांतधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी दिली.
मुलींच्या प्रमाणात वाढ करता यावी गर्भलिंग निदान पुर्णत: बंद करता यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार शहरातील हॉस्पिटल  व सोनोग्राफी केंद्राची तपासणी मोहीम हाती घेण्यातआली आहे. प्रांतधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या अध्यक्षेतेखाली चार पथकामार्फत ही तपासणी मोहीम दिनांक 26 सप्टेंबर 2017 पासून सुरु करण्यात आली आहे. यापथकामध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, तहसिलदार मधुसूदन बर्गे , उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षिका जयश्री ढवळे, न.पाचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे, न.पाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल जोशी , नायब तहसिलदार अविनाश पवार यांनी तपासणी केली.
यावेळी शार्दुल डाग्नोस्टिक सेंटर, अग्रज हॉस्पीटल, गणपती हॉस्पीटल, श्रीयश हॉस्पीटल ,मेडीकेअर आय.सी.यू जनकल्याण हॉस्पीटलची , मोहिते हॉस्पीटल, शिेंदे डॉयग्नोस्टिक सेंटर , श्री.विठ्ठल हॉस्पीटल , गडम डॉयग्नॉस्टीक सेंटर, , गोळवलकर हॉस्पीटल  तसेच फॅबटेक हॉस्पीटलची  तपासणी करण्यात आली.
यावेळी पीसीपीएनडीटी ॲक्ट अंतर्गत  हॉस्पीटल व सोनोग्राफी केंद्रामध्ये स्वच्छता ठेवण्याबरोबरच  र्निजंतुकीकरण करण्यात यावे . तज्ज्ञ डॉक्टरांकडे रुग्णांना पाठविताना  स्व:ताचे लेटर पॅडवर लेखी लिहून पाठवावे. तसेच ज्या डॉक्टरकडे रुग्ण पाठविला आहे त्यांनी रुग्णांची माहिती ठेवावी. जे रुग्ण सोनोग्राफी करण्याकरीता हॉस्पीटल व सोनोग्राफी केंद्रामध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून पहिल्या,दुस-या, तिस-या अपत्याची माहिती घेवून वर्गीकरण करावे. तसेच हॉस्पीटल व सोनोग्राफी केंद्रामध्ये गर्भलिंग तपासणी केली जात नसल्याचे फलक ठळक अक्षरात दर्शनीभागावर लावावेत. मासिक अहवाल पाठविताना त्यामध्ये आवश्यक बाबीचा समावेश असावा. तसेच केलेल्या कामाकाजाचे अभिलेखे तपासणीसाठी उपलब्ध ठेवावेत अशा सुचना प्रांतधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी यावेळी दिल्या.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *