पंढरपूर शहरामधील भुयाचा मारुती, जुनी पेठ कोळे गल्ली भागामध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरीक करित होते. याची दखल घेवुन आ.प्रशांतराव परिचारक यांनी आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमंत बागल, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, शिक्षण समितीचे सभापती संजय निंबाळकर, नगरसेवक विशाल मलपे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या समवेत या भागाची पाहणी केली.

शहरामध्ये नगरपरिषदेच्यावतीने व सार्व.बांधकाम विभागाच्यावतीने तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये गजानन महाराज मठ ते श्री.संत गाडगेबाबा चौक, पर्यटक निवास ते साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक ते मध्यप्रदेश भवन, महात्मा ज्योतिबा फुले चौक ते गोपाळपुर पुल या रस्त्यांची कामे सार्व.बांधकाम विभागाकडे असुन या रस्त्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. यामध्ये विशेषत: भुयारी गटारीचे चेंबर रस्त्याच्यावर आल्याने अपघात झाले आहेत. तसेच या रस्त्याची कामे करताना भुयारी गटारीची झाकणे बंद झाली आहेत व काही भागात रस्ता खोदुन ठेवल्याने धुळीचा त्रास नागरीकांना होत होता. तसेच काही भुयारी गटारीचे चेंबर्समध्ये खडी व माती जावुन बुजल्याने भुयाचा मारुती, जुनी पेठ, कोळे गल्ली या भागामध्ये भुयारी गटारीचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे नागरीक याबाबत नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्याकडे तक्रारी करत होते. याबाबत पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट यांनी रस्त्याची कामे सार्व.बांधकाम विभाग यांनी पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशाराही सार्व.बांधकाम विभागाला दिला होता. नागरीकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांनी रस्त्याच्या कामाबाबत येणा-या अडचणी आ.प्रशांतराव परिचारक यांच्याकडे मांडल्या. यावर आज स्वत: आ.प्रशांतराव परिचारक यांनी जातीने लक्ष घालुन भुयाचा मारुती, जुनी पेठ, कोळे गल्ली परिसरात सर्व अधिका-यांसमवेत चालत या भागाची पाहणी केली. तसेच सोबत असलेल्या कर्मचा-यांना स्वत: उभारुन भुयारी गटारीची चेंबरची झाकणे काढुन पाण्याची पातळीची पाहणी केली.

तसेच रिद्धीसिद्धी मंदिर ते गोपाळपुर पुल येथील रस्त्याचे काम चालु असताना बुजविण्यात आलेल्या चेंबरची पाहणी केली व चेंबरमध्ये दगड माती पडल्यानेच कोळे गल्ली, जुनी पेठ भागातील भुयारी गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याचे नगरपरिषदेच्या अधिका-याने निदर्शनास आणुन दिले. तसेच मध्यप्रदेश भवन ते पर्यटक निवास पर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. येणा-या अडचणी लवकरात लवकर सोडवुन रस्त्याची कामे चांगल्या प्रतीची व विहीत मुदतीत पुर्ण करावीत. अशा सुचना आ.प्रशांतराव परिचारक यांनी उपस्थित असलेल्या सर्व अधिका-यांना दिल्या. यावर सार्व.बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमंत बागल यांनी रस्त्याचे कामकरिता असताना बुजलेल्या चेंबरमध्ये पडलेले दगड व माती उचलणेचे काम त्वरीत चालुन करुन रस्त्याचीही कामे त्वरीत चालु करत असल्याचे सांगितले.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




