पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017
कोपरगाव:- बर्याच दिवसापासून बेपत्ता असलेली सौ.प्रियंका प्रमोद सिनगर (२२ ) या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने भोजडे व संवत्सर गावात खळबळ उडाली असून घातपाताचा आहे का ? यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सौ.प्रियंका प्रमोद सिनगर मु.पो.भोजडे ता.कोपरगाव हि दि.०३ नोव्हेंबर सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून मिसिंग गुन्हा दाखल केला होता. मात्र तीन दिवसांनंतर सदर बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याची माहिती विहिर मालकाने कोपरगाव ग्रामीण पोलीसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व विहिरीतून मृतदेह बाहेरकाढून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. मात्र बाॅडी जास्त कंपोस्ट झालेली असल्याने वैद्यकीय अधिकारी यानी शवविच्छेदनासाठी बाॅडी घाटी हाॅस्पीटल औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला पोलिसांना दिला. त्यामुळे आज पहाटे घाटी हाॅस्पीटल येथे शवविच्छेदन करण्यात आले.*
*दरम्यान मयत सौ.प्रियंका प्रमोद सिनगर हिचे माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीचा घातपात झाला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असल्याचे कळते.*
*कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विजय बाबासाहेब सिनगर हे भोजडे शिवारातील आपल्या गट नं.३१० / ४ मध्ये असलेल्या शेतात पाणी भरायला गेले असता एक महिला जातीचे शव तरंगताना दिसले याबाबत त्यांनी कोपरगाव पोलीसांना खबर दिली. पोलिसांनी बेवारस आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पहिली मिसिंग आता आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.*
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




