👁 10 Views

श्री विठ्ठल मंदिरातील महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता.. हरिदास घराण्यातील 400 वर्षाची परंपरा आजही कायम!


श्री विठ्ठल मंदिरातील महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता.. हरिदास घराण्यातील 400 वर्षाची परंपरा आजही कायम!    






पंढरपूर Live 9 NOVEMBER 2017

    पंढरपूर- येथील हरिदास घराण्यातील संत श्री पांडुरंग महाराज यांना ४०० वर्षापुर्वी श्रीविठ्ठलाने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष दर्शन देऊन खडावा (पादुका) दिल्या व आषाढ वद्य प्रतिपदा व कार्तिक वद्य प्रतिपदा या दिवशी या पादुकासोबत गोपाल काल्याचा (दहिहंडी) उत्सव मंदिरात साजरा करित जा.त्याप्रमाणे प्रतिवर्षी या श्री विठ्ठल मंदीरातील  महाद्वार काल्याने दोन्ही यात्रेची सांगता होते.या पादुका मस्तकी धारण करण्याचा मान ह भ प मदनमहाराज हरिदास यांचेकडे आहे.त्यांचे मस्तकी या पादुका दोनशे हात लांब असलेल्या पागोट्याने बांधल्या जातात.संत नामदेव महाराजांचे वंशज ह भ प नामदास महाराज यांचे दिंडी समवेत नामदेव पायरी येथून श्रीविठ्ठल मंदिरातील सभामंडपामध्ये येऊन तेथे दहिहंडी फोडुन हा उत्सव संपन्न होतो.यावेळी सभामंडपात भाविकांची,वारकर्‍यांची फार मोठी गर्दी असते. नंतर वारकरी दिंड्यांसोबत हा सोहळा महाद्वारातुन चंद्रभागा वाळवंटात भक्त पुंडलिक मंदिरानजिक पोहोचतो,त्याठिकाणी चंद्रभागा जलसिंचन होऊन कुंभार घाटमार्गे  माहेश्र्वरी (भवन) धर्मशाळेत येतो त्याठिकाणी लाह्यांचा वर्षाव करण्यात येतो.त्यानंतर हरिदास वेस मार्गे या दिंड्या पुन्हा काल्याच्या वाड्यात येतात.तेथे मदन महाराजांच्या मस्तकावरील पादुका उतरविल्या जातात.आरती होऊन दहिकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात येतो.या प्रसंगी मार्गावर आकर्षक रांगोळी काढली जाते.अनेक ठिकाणी पादुकांवर गुलाल ,बुक्का अष्टगंध,यांचा वर्षाव करुन  पुष्पवृष्टी केली जाते.ही हरिदास घराण्यातील परंपरा मागील ४०० वर्षापासुन अखंडपणे चालू आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *