सामाजिक जाणीव जपत सोलापूर जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे सुपुत्र चि. साकेत भारुड यांचा प्रथम वाढदिवस स्नेहालय कारंबा येथील अनाथ, निराधार, उपेक्षित बालकांसमवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालकांना भेटवस्तू म्हणून शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले.
डॉ.राजेंद्र भारुड बोलताना म्हणाले की स्नेहालयाचे कार्य कौतुकास्पद असून तितकेच आवहनात्मकही आहे, यावेळी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुलांसोबत गप्पागोष्टी करत मार्गदर्शनही केले व स्नेहालयाच्या पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी सौ.भारुड, शंकरराव मोहिते पाटील संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र मस्के, गटशिक्षण अधिकारी मा. राजशेखर नागणसुरे, सी ए अविनाश गोडसे, समस्त ठाकूर,भारुड परिवार व्यवस्थापिका वैशाली अकोलकर,अधिक्षक विकास वाघमोडे, समुपदेशक रविंद्र गडदे,विनायक मदने,दिनेश झालटे व स्नेहालयातील बालके उपस्थित होते.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





