👁 7 Views

नवमतदारांना मिळणार स्मार्ट ओळखपत्र



पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017

सोलापूर दि. 22 :-  नवमतदारांची मतदार यादीत जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आता सोशल मिडीयाचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर नवमतदारांना स्मार्ट मतदान ओळखपत्र वितरीत केले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांनी आज दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार छायाचित्र याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रम तीन ऑक्टोबर 2017 पासून सुरू झालेला आहे. हा कार्यक्रम 30 नोव्हेंबर 2017 पर्यत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमात 1 जानेवारी 2000 या दिवशी जन्मलेल्या युवक – युवतींचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीत समावेश करण्यात येणार आहेत. या मतदारांना सहस्त्रक मतदार (मिलेनियम व्होटर) असे संबोधण्यात येत आहे. यांनी आपली नोंदणी nvsp.nic.in व्दारे करावी, असे आवाहनही श्री. धुमाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख, ग्रामपंचायत, दवाखाने, जन्ममृत्यूचे दाखले देणारे अधिकारी, यांच्या माध्यमातूनही एक जानेवारी 2000 रोजी जन्मलेल्या युवक – युवतींचा शोध घेतला जाऊन त्यांची नोंदणी केली जाणार आहे. अशा नोंदणी झालेल्या युवक – युवतीचा 25 जानेवारी 2018 रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात मी भारताचा सहस्त्रक मतदार आहे ( I am the Millennium Voter Of India) असे लिहीलेला खास बॅच देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या नोंदणी झालेल्या नवमतदारांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याव्दारे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहस्त्रक मतदारांनी नोंदणी झाल्यानंतर त्यांचे छायाचित्र व मतदार ओळखपत्र स्वत:च्या फेसबुक पेजवर टाकावे तसेच सदरचे छायाचित्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, भारत निवडणूक आयोगाच्या फेसबुक पेजशी टॅग करावे , असेही श्री. धुमाळ यांनी सांगितले.
तरी 1 जानेवारी 2000 रोजी जन्मलेल्या तरूण – तरूणींनी महाविद्यालय, तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे नाव नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *