पंढरपूर Live 23 NOVEMBER 2017
पंढरपूर, प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य हमाल मापाही महामंडळाचे 20 द्वैवार्षिक राज्य अधिवेशन शनिवार व रविवार दि. 25 व 26 रोजी बीड येथे होत आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 2 हजार हमाल मापाडी कामगार अधिवेशनासाठी जाणार असल्याचे सोलापूर जिल्ह हमाल मापाडी पंचायतचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील व देशातील शेतमजूर हमाल, मापाडी, बांधकाम कामगार, गॅरेज कामार, उसतोडणी कामगार, मोलकरीण यांच्यासह 122 प्रकारच्या असंघटीत कष्टकर्यांना एपीएल-बीपीएल असा भेद न करता पेन्शन मिळावी या करिता पेन्शन परिषद व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे 20 वे द्वैवार्षिक राज्यव्यापी खुले अधिवेशन बीड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुर्ला रोड वरील मार्केट यार्डात संपन्न होत आहे.
पेन्शन परिषद व खुले अधिवेशनाच्या सुरवात शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मशाल मिरवणूकीने होईल. सदर मिरवणूक 11 वा. कुर्ला रोड वरील मार्केट यार्डात पोहचेल व कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.

राज्यव्यापी पेन्शन परिषदेचे व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडाळाच्या अधिवेशनाचे उद्घाटन जेष्ठ नेते भारताचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी अंगमेहनती कष्टकर्यांचे राष्ट्रीय नेते डॉ. बाबा आढाव हे उपस्थित राहणार आहेत. पेन्शन परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले, अरूणा रॉय, पालकमंत्री ना. पंकजा मुंडे, तर रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी खुले अधिवेशनासाठी कामगार मंत्री ना. संभाजी पाटील निलंगेकर, सहकार व पणनमंत्री ना. सुभाष देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. वरील कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर राहणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, सोलापूर, कुर्डूवाडी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ, अक्कलकोट, दुधनी, वैराग, मोडनिंब आदी ठिकाणच्या सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




