👁 6 Views

अनिकेत कोथळे प्रकरण: सांगलीचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व उपअधिक्षक डॉ. दिपाली शिंदे यांची अखेर बदली… शिंदे नागपूरकडे तर काळे सोलापूर शहर उपायुक्तपदी…!

पंढरपूर Live 23 NOVEMBER 2017

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांची गुरुवारी बदली करण्यात आली. शिंदे यांची बदली होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले.
दत्तात्रय शिंदे यांच्याकडे राज्य राखीव दलाच्या समादेशकपदाची जबाबदारी देत त्यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. उपअधीक्षक पदावर काम करत असलेल्या डॉ. दिपाली काळे यांच्याकडे सोलापूर शहर उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उपअधीक्षकपदी अशोक विरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झालेले सुहैल शर्मा सध्या कोल्हापूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर उपअधीक्षक पदावर नेमणूक झालेले अशोक वीरकर सध्या नांदेडमधील देगलूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहेत.
चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली होती. याप्रकरणी आतापर्यंत १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, प्रमुख आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह ५ जणांना न्यायालयाने यापूर्वी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *