पंढरपूर Live 27 NOVEMBER 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) :- मार्गशीर्ष महिन्याचे औचित्याने येथील साहित्य वर्तुळ परिवाराच्या वतीने नौकाविहार काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या नौकाविहार काव्यसंमेलनादरम्यान येथील विष्णूपद परिसरातील नदी पात्रात होडीत बसून नौकाविहार काव्यसंमेलन संपन्न झाले. 

या नौकाविहार काव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव बागल सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक मा. गणेश अंकुशराव हे उपस्थित होते. या नौकाविहार काव्यसंमेलनादरम्यान समाजसेवक गणेश अंकुशराव यांच्या सामाजिक कार्याबद्दल साहित्य वर्तुळ परिवाराच्या वतीने त्यांचा मानाची पंढरपूरी मखमली टोपी, उपरणे व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नौकाविहार काव्यसंमेलनादरम्यान साहित्य वर्तुळचे संस्थापक अध्यक्ष रवि वसंत सोनार, सचिन कुलकर्णी, राजेंद्र झुंबर भोसले, दादासाहेब खरात, सूर्याजी भोसले, सुजितकुमार कांबळे या सहभागी कवींनी नदी, नदीचे प्रदुषण आणि नदीच्या इतर प्रश्नांबाबत आपल्या कवितांमधून उहापोह केला. यावेळी अभंग आणि हायकू वाचन करण्यात आले. तसेच यावेळी साहित्य वर्तुळ परिवाराच्या सदस्यांनी परिसरातील अस्ताव्यस्त पडलेला कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून कचरा कुंडीत टाकला.
सदर नौकाविहार काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक रवि सोनार यांनी केले. सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र झुंबर भोसले यांनी मानले. काव्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्य वर्तुळ परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





