👁 10 Views

डिजीटल नियंत्रण कक्षातून सायबर गुन्हेगारी रोखण्यास मदत -पद्मश्री डॉ.विजय भटकर… ग्रामीण पोलीसांच्या अत्याधुनिक नियंत्रण कक्ष अन ई तक्रार केंद्राचे उद्घाटन


पंढरपूर Live 1 December 2017
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस दलातही सायबर तज्ञ आणि नवनवीन अ‍ॅपस निर्माण झाले पाहिजेत नव्याने सुरू झालेल्या पोलीसांच्या डिजीटल नियंत्रण कक्षाच्या मदतीने सायबर गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महासंगणकाचे जनक पद्मश्री, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अत्याधुनिक पोलीस नियंत्रण कक्षाच्या नुतणीकरणाचे उद्धाटन तसेच नागरीकांसाठी ई तक्रार केंद्राचा शुभारंभ डॉ. भटकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

देश डिजीटल इंडियाकडे वाटचाल करीत आहे. प्रगतीच्या मार्गावर असताना सायबर गुन्हेगारीही वाढणार आहे. परंतु नागरीकांनी संगणकाचा आणि मोबाईलचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. पोलीसांनाही नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असली पाहिजे बदलत्या तंत्रज्ञानाचे आत्मसात करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे डिजीटल सेवाकडे वाटचाल करीत आहे त्यातूनच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आधुनिकतेचे हे नवे पाऊल टाकून डिजीटल नियंत्रण कक्ष उभारले आहे. डिजीटल इंडियाच्या मोहिमेत पोलीसही मागे नाहीत यातूनच हे दिसून येते असेही पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. 

ई तक्रार केंद्रातून नागरीकांना त्यांच्या तक्रारीची दखल कोणत्याही अडचणीशिवाय पोलीसांपर्यत पोहोचवता येईल त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करता येईल हे पोलीसांचे पाऊल आधुनिकतेच्या दिशेने जात असल्याचेही डॉ. विजय भटकर यांनी सांगितले.
डिजीटल नियंत्रण कक्ष केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही पोलीसांची गस्त सुरू असेल ते ठिकाण नियंत्रण कक्षात दिसणार आहे. पोलीसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवल्यामुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे त्यातून पोलीसांवरील ताण कमी होणार आहे. नियंत्रण कक्षात काम करणार्‍या पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांनाही कामाचा ताण जाणवणार नाही असे वातावरण या नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून जे पोलीस घटनेच्या जवळ असतील त्यांना पोहचण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. असे पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सांगितले. ई तक्रार केंद्रामुळे नागरीकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलीसांना घ्यावी लागणार आहे त्यामुळे पोलीसांची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे असेही पोलीस अधिक्षक प्रभू यांनी सांगितले. एका ि्नलकवर पोलीसांबद्दलची आणि गुन्ह्याची माहिती सर्वसामान्यांना मिळणार आहे असेही ते म्हणाले.

प्रारंभी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर नागरीकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या ई तक्रार केंद्राचा शुभारंभ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. त्यांनी या केंद्राच्या कामकाजाची माहिती तेथील कर्मचार्‍यांकडून घेतली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाचे अत्याधुनिकरण झालेल्या कक्षाचे उदघाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुंबई, पुणे आणि सोलापूर शहर नंतर ग्रामीण पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष डिजीटल करणारी सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे आधुनिकतेकडे वाटचाल करणारे राज्यातील पहिले ग्रामीण पोलीस दल ठरले आहे. नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी केले. या कार्यक्रमाला पोलीस उपाधिक्षक युन्नूस अत्तार, पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुर्वे, विया कुरी, शरद बारावकर, नाना कदम,सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *