👁 10 Views

अनाधिकृत वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

पंढरपूर Live 14 December 2017
           पंढरपूर, दि. 13 – तालुक्यातील  चिंचोली भोसे हद्दीतील  भीमा नदीपात्रातून  बेकायदेशीर अवैध वाळू  उपसा करुन वाहतूक सुरु असताना इसबावी हद्दीतील  नदीपात्रात  महसूल व पोलींसाच्या पथकाने संयुक्तपणे छापा  टाकून 15 होड्या  जे.सी.बीच्या सहाय्याने नष्ट  केल्या तसेच  तेथील 2 ब्रास वाळू जप्त केली  असल्याची माहिती प्रांतधिकारी  डॉ.विजय देशमुख दिली.

            भीमा नदीपात्रात बेकायदेशीर अवैद्य वाळू उपसाकरुन होड्याव्दारे वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार  उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख व सहायक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार व तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दोन  पथके तयार करुन बेकायदेशीर अवैद्य वाळू उपसाकरणा-या  15 होड्या पकडून जे.सी.बीच्या सहाय्याने नष्ट केल्या .या धडककारवाईत नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, मंडलाधिकारी समीर मुजावर, तलाठी राजेंद्र वाघमारे, समाधान शिंदे, आप्पासाहेब काळेल, मुसा काझी, खंडेराव गायकवाड, श्री. यादव यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहभागी होते.      






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *