👁 13 Views

विकास आराखड्यातील कामांना वाळू उपलब्ध करून द्यावी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची सूचना

पंढरपूर Live 14 December 2017
विकास आराखड्यातील कामांना
वाळू उपलब्ध करून द्यावी
 विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची सूचना
सोलापूर दि. 14 :- पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बांधकामांना वाळू उपलब्ध करून द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.
   पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आज विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस उपायुक्त उत्तम चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.



पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील चंद्रभागा नदीपात्रातील घाटाचे काम वाळू अभावी थांबले असल्याचे सांगण्यात आले. यावर जिल्हा प्रशासनाने जप्त केलेली वाळू बांधकामास उपलब्ध करून द्यावी अथवा कृत्रिम वाळूचा वापर करून बांधकाम पूर्ण करण्यावर भर द्यावा. येत्या पंधरा दिवसात पाआचे काम सुरू करावे. याबाबत आराखडा कार्यकारी समितीच्या बैठकीत अहवाल सादर करावा, अशा सूचना श्री. दळवी यांनी दिल्या.
पंढरपूर विकास आराखड्यातील कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्याकडून अहवाल मागवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कामातील तफावत अथवा गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असेही श्री. दळवी यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या रिक्त जागेत नवीन शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा, अशी सूचना त्यांनी दिली.सोलापूर जिल्ह्यातील पालखी तळांचा विकास करण्यासाठी जमिनीचे संपादन करा. ही प्रक्रिया गतीने केली जावी, असे त्यांनी सांगितले.
65 एकर तळाच्या शेजारील रेल्वेची 15 एकर जागा मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी. 65 एकर तळाचा विकास आराखडा करताना वाढीव 15 एकर जागा मिळणार आहे याचा विचार करून विकास करावा, असे श्री. दळवी यांनी सांगितले.
65 एकर परिसरात बांधण्यात येणारे सभागृह रद्द करण्यात यावे असे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले. यावर नगरपालिकेच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहामुळे 65 एकर जागेतील सभागृह उभारले जाऊ नये असे श्री. दळवी यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंता यांनी एकत्रित बसून पंढरपुरातील नगरपालिकेच्या विकासकामांबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिली. बैठकीस देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, विजय देशमुख, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, रेल्वेचे विभागीय अभियंता सचिन गणेर आदी उपस्थित होते.
दरम्यान महसूल प्रशासनातील विविध प्रलंबित प्रकरणे 31 डिसेंबर पर्यत निकालात काढा, अशा सूचना श्री. दळवी यांनी झिरो पेंडन्सी बाबातच्या बैठकीत सर्व उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना दिल्या. उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नगरपालिकांना भेट द्यावी. त्याची पाहणी करावी असे सांगितले. पोलीस पाटील पदांची भरती 31 डिसेंबर 2017 पुर्वी करावी. रिक्त जागासाठी पुन्हा जाहिरात दिली जावी, असे त्यांनी सांगितले.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *