👁 9 Views

पंढरपूर नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदासाठी परिचारक गटाकडून इच्छूक-शुभम श्रीखंडे

पंढरपूर Live 15 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘आमची ही तिसरी पिढी आहे की, जी परिचारक गटाशी एकनिष्ठ आहे. आजतागायत आमचे आजोबांसह आमच्या घराण्यातील सर्व सदस्य हे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक, पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांचा शब्द जीवापाड जपणारे व प्रामाणिकपणे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता नेत्यांचा शब्द तडीस नेणारे म्हणून नावलौकीक मिळवलेला आहे. पंढरपूर शहर व उपनगर परिसरात विविध सामाजिक कार्यातही आमच्या घराण्याचा सक्रीय सहभाग असतो. आजपर्यंत आम्ही कधीही कोणत्याही राजकीय पदाची अथवा लाभाची अपेक्षा केलेली नाही. परंतु आमच्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी आपण परिचारक गटाकडून इच्छूक आहोत.’’ अशी माहिती शुभम दत्तात्रय श्रीखंडे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

पंढरीतील कै. बजरंग श्रीखंड हे कर्मयोगी सुधाकरपंत परिचाक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले. जात त्यांनी आपल्या हयातीत परिचारक गटाच्या राजकीय कारकिर्दीत परिचारक गट मजबुत होण्यासाठी खुप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्या घराण्यातील शुभम श्रीखंडे च्या रुपाने ही तिसरी पिढी परिचारक गटाशी एकनिष्ठतेने राजकारणात व समाजकारणात सक्रीय राहिलेली आहे. आमच्या नेत्यांनी जर मला स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली तर नक्क्कीच यासंधीचे सोने करु असे मत यावेळी शुभम श्रीखंडे यांनी व्यक्क्त केले.  

पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाल लवकरच संपणार असल्याने आमदार परिचारक गट व आमदार भालके यांच्या गटातील अनेक इच्छूकांकडून नेत्यांकडे यासंदर्भात आपली नियुक्क्ती करावी अशी मागणी वाढत आहे. आमदार परिचारक गटाकडूनही अनेक इच्छूकांची नांवे समोर येत आहेत. 

  





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर


 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *