👁 6 Views

पंढरीत राष्ट्रवादी युवक कॉगे्रसच्या वतीने शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


पंढरपूर Live 16 December 2017
पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेस वतीने देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने व विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेेसने  गेल्या काही महिन्यात पुन्हा नव्याने पक्षाची बांंधणी करण्याच्या उद्देशाने अनेक पदाधिकार्‍यांच्या निवडी करुन पक्षाच्या विस्तारासाठी ठोस प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शहर व तालुक्यात राष्ट्रवादीचा शाखाविस्तार मोठया प्रमाणात होताना दिसून येत आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून आले.

          पंढरीच्या पांडुरंगाने आमच्या जाणत्या राजाला,गोरगरीबांचा,शेतकरी यांचा कैवारी असलेल्या पवार साहेंबाना उदंड आयुष्य बहाल करावे यासाठी राष्ट्रवादी युवक काग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे व पदाधिकार्‍यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी पुजा करण्यात आली व मातोश्री वृध्दाश्रम गोपाळपूर येथे निराधार वृध्दांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.यावेळी सर्ववृध्दांनी शरदचंद्र पवार साहेबांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचा योग नक्की येईल असे शुभाशिर्वाद दिले.या निमित्ताने आज राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव यांच्यावतीने शहरातील माता-भगिणींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने येथील कोळी समाज मठात आरोग्यतपासणी  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
              या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले,राजुबापू पाटील,युवराज पाटील,मोहोळ तालुका निरिक्षक दिगंबर सुडके,शहराध्यक्ष सुधीर भोसले,मतदारसंघ अध्यक्ष दिपक वाडदेकर,जि.प.सदस्य अतुुल खरात हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
     या कार्यक्रमांचे आयोजक राष्ट्रवादी युवक कॉग्रेस शहराध्यक्ष संदीप मांडवे,शहर संघटक भास्कर जगताप,ओबीस विभाग शहर अध्यक्ष अनिल सप्ताळ,मारुती जाधव, कृष्णा माळी,कार्याध्यक्ष मनोज आदलींगे, शहर संपर्क प्रमुख विजय मोरे,शहर उपाध्यक्ष निलेश कोरके,शहर सचिव सागर कावरे,प्रभाग अध्यक्ष गणेश माने,प्रभाग अध्यक्ष वैभव शिवशरण,प्रभाग अध्यक्ष रविंद्र आटपाडकर,ओबीसी विभाग महिला जिल्हाध्यक्ष साधना राऊत,महीला शहराध्यक्ष रंजनाताई हजारे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,शहाध्यक्ष रशीद शेख,शहर उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी,सेवादल जिल्हाकार्याध्यक्ष दिलीप भोसले,दिलीप साबळे,जिल्हाकार्याध्यक्ष सुधामती माळी,महीला तालुकाध्यक्ष अनिता पवार,तालुकाध्यक्ष जयश्री माडगुळकर,शहराध्यक्ष मनिषा शिंदे,वनिता घोडके,अनिताा नगरे,युवती शहराध्यक्ष चारुशिला कुलकर्णी,उपाध्यक्षा प्राजक्ता पवार,  विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष ॠषीकेश पवार,विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष अभिराज साळुंखे,उपाध्यक्ष जय देशमाने,शुभम साळुंखे आदींसह शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.   



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *