पंढरपूर Live 21 December 2017
पंढरपूरच्या स्वाती बंगाळे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान
सांगली येथे आयोजीत अखिल भारतीय आंबेडकरवादी शाहिरी व लोककला संमेलनात पंढरपूर येथील प्रख्यात कवयत्री स्वाती भास्कर बंगाळे यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील व आंबडेकरवादी विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष खेमराज भोयर यांच्याहस्ते यावेळी सांगली महानगरपालीकेचे आयुक्त प्रविण खेबूडकर,गायक संगीतकार नंदेश उमप,संमेलनाचे अध्यक्ष शाहीर सम्राट देवानंद माळी,स्वागताध्यक्ष शेखर इनामदार,समाजकल्याण अधिकारी श्री कासार,आंबेडकरीवादी मंचचे सांगली जिल्हाध्यक्ष शाहीर राहुल कांबळे,उत्तम कांबळे,तालुकाध्यक्ष प्रल्हाद यादव यासह अनेक साहित्यीक व कवी,विचारवंत उपस्थित होते.
आंबेडकरवादी साहित्य कला व विचारमंच नागपूर शाखा सांगली द्वारे अखिल भारतीय आंबेडकर वादी शाहिरी व लोककला संमेलन दिनानाथ मंगेशकर नाटयगृह सांगली येथे दिनांक 17 डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आले होते.या संमेलानच्या उदघाटक व विचारमंचच्या विभागीय अध्यक्षा कवयत्री स्वाती बंगाळे यांना सामाजिक,सांस्कृतीक,साहित्यीक व संघटनात्मक कार्यासाठी राजमाता जिजाऊ पुरस्कार,गौरवपत्र व 11 हजार रोख प्रदान करुन गौरविण्यात आले.या साहित्य संमेलनास सांगली जिल्ह्यातील अनेक कवी,गायक,आंबेडकरी चळवळीतील साहित्यीक व लोककलावंत उपस्थित होते.पंढरपूर येथील स्वाती बंगाळे यांना यापुर्वीही अनेक राज्यव्स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे