👁 6 Views

अ.भा. छावा मराठा युवा संघटनेच्या 30 शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
===================
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर


=====================
भाजपा सरकारला गोरगरीबांचे व शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सुबुध्दी दे..! 
नानासाहेब जावळे पाटलांचे श्रीविठ्ठलाला साकडे..!
पंढरपूर Live 25 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या एकुण 30 शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा पंढरपूर तालुक्यात संपन्न झाला. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या शुभहस्ते सर्व शाखांच्या नामफलकांचे अनावरण यावेळी करण्यात आले. शाखांचे उद्घाटनाननिमित्त पंढरीत आलेले नानासाहेब जावळे पाटील यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाजपा सरकारला गोरगरीबांचे व शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याची व त्यांचे भले करण्याची सद्बुध्दी दे! अशी श्रीविठ्ठलाकडे त्यांनी प्रार्थना केली.
राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवरायांना वंदन करुन पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वार्ताफलकाच्या अनावरणानंतर या शाखा उद्घाटनांचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील शाकांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पिराची कुरोली येथे नानासाहेब जावळे पाटील यांची भव्य सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात व देशातील भाजपा सरकारकडून केवळ आश्‍वासनांची खैरात वाटली जातीय परंतु प्रत्यक्षात कोणत्याही आश्‍वासनांची पुर्तता झालेली आढळून येत नाही. भाजपा सरकारने आमच्या शेतकरी बांधवांना व गोरगरीब समाज बांधवांना दिलासा मिळेल असे ठोस कार्य करणं अपेक्षीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष व डाळींब ही प्रमुख बागायती पिके आहेत. जीवाचं रान करुन येथील शेतकरी आपल्या बागा प्राणपणानं जपत द्राक्ष व डाळींबांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय परंतु या फळांना हमीभाव मिळत नाही. सरकारने द्राक्ष व डाळींबाला हमीभाव जाहीर करावा.  अखिल भारतीय छावा संघटन चा सर्वात महत्वाचा उद्देश महाराष्ट्रातील तरुण वर्ग व्यसनापासून लांब ठेवणं, त्यांच वापर राजकारण्यांना करु न देेणं त्यांच्या हाताला काम देणं, तरुणाईचा मेंदू तल्लख बनवणं, मन खंबीर बनवणं व त्यांच्या मनगटाला बळ देणं हा आहे. शिवछत्रपतींच्या विचाराने व राजमाता जिजाऊंच्या आशिर्वादानं आम्हाला कार्य करायचंय. स्वर्गीय आण्णासाहेब जावळे पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी जशी भव्य रथयात्रा काढून शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन लवकरच पुन्हा एकदा सरकारच्या निष्क्रीयेतेच्या विरोधात भव्य रथयात्रा काढणार आहोत. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी अ.भा. छावा मराठा युवा संघटनचे प्रदेशाध्यक्ष पै.भीमरावभाऊ मराठे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार  घाडगे पाटील, प.महाराष्ट्र अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील, ग्राहक आघाडी प.महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ पवार, आय.टी. विभाग प.महाराष्ट्र अध्यक्ष सागरदादा कदम, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष संजयराजे पवार, अनिल पाटील, नांदेड जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे,  पाटील, पुणे ग्राहक आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश पवार, सोलापूर जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, उपाध्यक्ष सागर रणदिवे, आय. टी. जिल्हाध्यक्ष बालाजी माने, जिल्हा कार्याध्यक्ष विजय सगर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अमोल सगर, पंढरपूर शहराध्यक्ष सतीशअप्पा माने, तालुकाध्यक्ष हनुमंत घाडगे, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रमोद सुरवसे, मोहोळ शहराध्यक्ष देसाई, वि.आघाडी पंढरपूर शहराध्यक्ष प्रणव राऊत, प्रसिध्दीप्रमुख बाळासाहेब गोडबोले, पंढरपूर शहर उपाध्यक्ष गणेश जाधव, सौदागर भोसले, निलेश कदम, धनंजय थिटे, नागेश थिटे, सोमनाथ गांगुर्डे, जितु काळे व असंख्य कार्यकर्ते व सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *