👁 9 Views

रुग्णालयांच्या तपासणीसाठी समिती नियुक्तीचा निर्णय

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 26 December 2017

रुग्णालयांच्या तपासणीसाठी
समिती नियुक्तीचा निर्णय
सोलापूर दि.24:- धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असणाऱ्या इस्पितळातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज याबाबतच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुमेध अणदूरकर, सहायक जिल्हा‍ आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सह धर्मादाय आयुक्त गीतांजली कोरे आदी उपस्थित होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, ‘जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी दहा टक्के राखीव खाटा ठेवण्यात येतात याबाबत माहिती दर्शनी भागात लावली जावी. पण अशा माहितीचे फलक नसल्याचे आढळून येते. सर्व रुग्णालयात जमा होणाऱ्या देयकाच्या दोन टक्के रक्कमही बाजूला काढून ठेवली जाते का? त्यामधून गरीब रुग्णांवर उपचार केले जातात का याची तपासणी केली जावी’.
यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी धर्मादाय दवाखान्यांची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल.  ही समिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी करेल आणि अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करेल, असे सांगितले.


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *