पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 26 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘विद्यार्थ्यांनो स्वप्नं पहायचं सोडू नका… स्वप्नांमुळेच माणुस मोठा होतो!’’ अशा शब्दात पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खरसोळी, ता. पंढरपूर येथील ज्ञानेश्वर माऊली विद्यालय येथे क्रीडा सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाच्या क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ नुकताच निखील पिंगळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे. सावंत, एन.डी. गोडसे, डी. एच. पाटील, आर. बी. जाधव, एन. डी. गाडेकर, लेंडवे, ताड, पवार, सुपने, गवळी, कांबळे, खुळपे, भोसले आदी शिक्षक वृंद, प्रगतशील बागायतदार दिलीपभाऊ पवार, बंडुराजे पवार, नागुआण्णा पवार, अशोक पाटील, संजय पवार, विठ्ठल पवार, विजय पवार, प्रशालेचे विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना निखील पिंगळे म्हणाले की, ‘‘शरिराची क्षमता व कृती फार महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. त्यासाठी त्यांना शिक्षक व पालक हे मार्गदर्शन करणारे महत्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन हे फक्त शिक्षकच देऊ शकतात. खेळाबरोबरच अभ्यास सुध्दा महत्वाचा आहे. स्पर्धा फार महत्वाची असते. स्पर्धेतून चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी स्पर्धा करताना शालेय जीवनात नेमके काय शिकले पाहिजे हे समजावुन घ्यावे. सर्व गोष्टी मनापासून आत्मसात करा. शिक्षकांचा व समाजातील लोकांचा आदर करायला शिका. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि वाईट सवयीपासून दुर रहाण्यासाठी नेहमी चांगला विचार करा. असे मौलीक मार्गदर्शन यावेळी निखील पिंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना आरएसपी साठी चांगली कामगिरी करु शकतील यासाठी पंढरपूर शहर वाहतुक शाखेच्या पोलिसांच्या सहकार्याने संपुर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करु. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
क्रीडा ध्वजारोहन करुन क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी निखील पिंगळे यांनी खो-खो खेळाचा शुभारंभ टॉस टाकून केला. तसेच या प्रशालेचा माजी विद्यार्थी आदर्श अशोक भोसले याने ‘पुलक्स’ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड जागतीक विक्रम केल्याबद्दल त्याचा सत्कार निखील पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, नागुआण्णा पवार, आदर्श भोसले व रोहीणी पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन पाटील डी. एच. यांनी केले तर आभार जाधव आर. बी. यांनी मानले.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





