पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
बीड, दि. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 7 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 06.15 वाजता औरंगाबाद येथे आगमन व वाहनाने परळी जि. बीडकडे प्रयाण सकाळी 09.30 वाजता यशश्री निवासस्थान परळी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.45 वाजता वाहनाने वैद्यनाथ कॉलेज, परळी वैजनाथकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता आगमन व मुलींचे अद्यवायत वस्तीगृह इमारत, बंदिस्त क्रीडा संकुल ( In Door ), खुले क्रीडा संकुल ( Out Door), लोकनेते गोपीनाथराव मुंडे ॲकेडमी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ वैद्यनाथ कॉलेज, परळी वैजनाथ, जि. बीड. दुपारी 14.00 वाजता यशश्री निवासस्थान परळी येथे आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 8 जानेवारी, 2018 रोजी परळी राखीव. मंगळवार दि. 9 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 08.30 वाजता वाहनाने गहिनीनाथगड, ता. पाटोदा, जि. बीड कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता आगमन व श्री संत वामनभाऊ महाराज 42 वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ श्रीक्षेत्र गहिनीनाथगड, चिंचोली (नाथ), ता. पाटोदा, जि. बीड. दुपारी 13.00 वाजता वाहनाने अहमदनगरकडे प्रयाण.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


