👁 12 Views

पोस्ट घोटाळा प्रकरणातील आरोपीच्या अटकपुर्व जामीन अर्जावर आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद पुर्ण

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
*जामीन अर्जावर 16 जानेवारी रोजी पुढील सुनावणी*
पंढरपूर येथील मुख्य डाक कार्यालयात 52 लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप असलेले पोस्टल कर्मचारी अमजद मुबारक शेख यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या प्रकरणी आरोपीने ऍड.शशी कुलकर्णी यांच्या मार्फत सदर गुन्ह्यातील आरोपीने हा अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता.या जामीन अर्जावर 8 जानेवारी रोजी युक्तीवाद पुर्ण झाला असून या बाबतची पुढील सुनावणी आता 16 जानेवारी रोजी होणार आहे.  
   यात हकीकत अशी की,शहरातील मुख्य टपाल कार्यालयात विमा हप्त्यापोटी जमा करण्यात आलेल्या 52 लाख रुपयांचा अपहार करण्यात आला असल्याच्या आरोपावरुन अमजद शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय धोत्रे हे करीत आहेत.पोस्टाच्या या घोटाळ्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसून आली होती.या प्रकरणात आरोपीच्या वतीने ऍड.शशी कुलकर्णी,ऍड.ओंकार बुरकूल,ऍड.स्वप्निल सरवदे तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍड.सारंग वांगीकर हे काम पहात आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *