👁 7 Views

वारकरी संप्रदाय युवा मंचच्या वैष्णव दर्शन दिनदर्शिकेचे पंढरीत प्रकाशन

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षित पिढी मध्ये संत वाड्मय प्रचार प्रसार तथा त्यातील तत्वज्ञान युवा पिढीपर्यंत जावे याकरिता श्रीअक्षयमहाराज भोसले व त्यांचे सहकारी रात्रंदिवस प्रयत्नशील असतात .  इंटरनेटच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व संत साहित्य प्रत्येका पर्यंत पोहचविण्यासाठी वारकरी संप्रदाय युवा मंचचे योगदान अभुतपुर्व आहे . व्यसनमुक्ती तथा स्त्रीशिक्षण , ग्रामस्वछता यातील योगदान महत्त्वाचे आहे .

मागील अनेक वर्षांपासून हे युवक कालदर्शिका प्रकाशित करतात . कालदर्शिका अनेक असतात मात्र यात वेगळेपण हे युवक जपतात . यंदा सकल संतांच्या समाधी दर्शन या विषयावर ह्या यवकांनी कालदर्शिका तयार केली आहे . त्यावर त्याठिकाणचे दिशादर्शन व जाण्याचामार्ग आदी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे . कुठल्या ही प्रकारचे शुल्क न घेता ही कालदर्शिका महाविद्यालयीन युवक तथा अभ्यासकांना व समस्त वारकरी वर्गाला मोफत वितरित केली जाते .

दि.06 जानेवारी 2018   रोजी श्रीदेगलूरकर मठ येथे वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ पू.श्री.वा.ना.उत्पात शास्त्री यांच्या शुभहस्ते व श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर , श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप श्रीसंजयमहाराज धोंडगे (अध्यक्ष – संत निवृत्तीनाथ संस्थान , श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला .  श्रीमाधवदासमहाराज राठी यांनी सूत्रसंचलन केले व श्रीअक्षयमहाराज भोसले यांनी आभार मानले . श्रीसदानंदमहाराज बग , श्रीशशीकांत काटे , श्रीप्रमोद पवार , श्रीप्रदीप वडणे , श्रीराम माळी , श्रीकांत खंडागळे आदी वारकरी संप्रदायातील सर्वच दिगग्ज मंडळी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते .

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *