👁 9 Views

माणनदी व कॅनॉल क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज (ङ्गॉर्म) त्वरीत भरावेत – आमदार भारत भालके


पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2018

मंगळवेढा ः दि.10 – उजनी धरणातील सन 2017-18 मधील रब्बी हंगामाची कालवा सल्लागार समितीची बैठक आज बुधवार दि.10.01.2018 रोजी मंत्रालय येथे पार पडली. सदर मिटिंगमध्ये उजनी धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते पाणी माण नदीला आणि कॅनॉलला सोडण्यात येणार असून या भागात असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज ङ्गॉर्म 6 नमुन्याचा ङ्गॉर्म विभागीय कार्यालयात त्वरीत भरावेत अशी विनंती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी केली आहे.
या बैठकीला पालकमंत्री मा.ना.श्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री श्री विजयकुमार देशमुख, आमदार श्री भारत भालके, आमदार श्री बबनदादा शिंदे, सह.मुख्य अभियंता श्री विलास रजपूत साहेब, अधिक्षक अभियंता श्री शिवाजी चौगुले, कार्यकारी अभियंता श्री नारायण जोशी, जिल्हाधिकारी श्री रामचंद्र शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
सदर मिटिंगमध्ये कॅनॉल व माण नदीला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने या भागातील शेतकर्‍यांना या पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. वेळेत पाणी सोडण्याचा निर्णय झाला नसता तर शेतकर्‍यांना हाता-तोंडाला आलेल्या पिकांना मुकावे लागले असते. पाण्याची मागणी संबंधित शेतकर्‍यांनी त्वरीत करणे गरजेचे असून पाणी मागणीचे अर्ज शेतकर्‍यांनी वेळेत न भरल्यास व पूर्ण मागणी न झाल्यास शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी इतरत्र वळविले जाऊ शकते. त्यामुळे या कॅनॉलवर आधारीत असणार्‍या गांवातील शेतकर्‍यांनी तात्काळ पाणी मागणी अर्ज भरावेत अशी विनंती आमदार श्री भारत भालके यांनी केली आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *