👁 9 Views

मे महिन्या मध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणार – आमदार भारत भालके

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018

मंगळवेढा ः दि.11 – मंगळवेढा तालुक्यातील गावांना म्हैसाळ योजनेतून लवकर पाणी मिळण्यासाठी जलसेतूच्या कामांना गती द्यावी अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री गिरिष महाजन यांचेकडे करताच मंत्री महोदयांनी संबंधित अधिकार्‍यांना ही मागणी त्वरीत मार्गी लावण्याचे आदेश दिल्याने ही कामे लवकरच पूर्ण होणार असून मंगळवेढा तालुक्याला मे महिना अखेर म्हैसाळचे पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार श्री भालके यांनी दिली.

बुधवार दि.10.01.2018 रोजी दुपारी 4.00 वाजता मंत्रालय, मुंबई येथे कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये वितरिका क्र.एक द्वारे मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळणार असून त्या वितरिकेचे काम सुरू असून 66.330 कि.मी.मध्ये असलेल्या 15 कॉलमच्या जल सेतूचे सध्या काम सुरू आहे. सध्या ते दर महिन्यास 2 कॉलम प्रमाणे काम सुरू असून यापेक्षा 4 कॉलम महिन्यात झाले तर एप्रिल पर्यंत काम पूर्ण होऊन त्या भागाला गरजेच्या काळात पाणी मिळेल अशी भुमिका सदर बैठकीत आमदार श्री भालके यांनी मंत्री श्री गिरिष महाजन यांच्याकडे मांडली. यास सकारात्मक प्रतिसाद देत 4 कॉलम पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. मध्यंतरी वाळू बंदीमुळे 2 महिने काम थांबले होते याबाबत ही शासनाचे लक्ष वेधत आमदार श्री भालके यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना वाळू उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या होत्या.
मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचेही काम रखडले होते, मात्र आमदार श्री भालके यांनी ऑक्टोबर 2016 आणि ऑगस्ट 2017 मध्ये बैठक घेत सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धते बाबत सतत पाठ पुरावा केल्याने यावर्षी राज्य सरकारने आर्थिक बजेट मध्ये रू.152 कोटी या कामासाठी वर्ग केले आहेत. या बैठकीत जलसंपदा मंत्री श्री गिरिष महाजन, आमदार श्री भारत भालके, आमदार श्री अनिल बाबर, आ.श्री सुरेश खाडे, माजी आमदार श्री दीपक साळुंखे, समाधान आवताडे यांच्यासह मुख्य अभियंता श्री टी.एन. मुंढे, अधिक्षक अभियंता श्री एच.व्ही.गुनाले कार्यकारी अभियंता श्री विजय पाटील उपस्थित होते.

दरम्यान म्हैसाळ या योजनेतून मंगळवेढा तालुक्यातील पडोळकरवाडी, लोणार, महमदाबाद(हु.), मारोळी, चिक्कलगी, शिरनांदगी, सलबर बु॥ सलगर खुर्द, जंगलगी, बावची या गावांना ङ्गायदा होणार आहे. तसेच जलसेतूचे काम जलद पूर्ण झाल्यावर शिरनांदगी येथे असणार्‍या तलावात पाणी येणार आहे अशी माहिती आमदार श्री भारत भालके यांनी दिली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *