👁 10 Views

बाह्यवळण रस्त्यावर दोन ट्रकची धडक; एक ठार

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018
निलेश चाळक बीड  : शहराजवळून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर गुरुवारी सकाळी पावणे सहा वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक ट्रकचालक जागीच गतप्राण झाला तर दोघे जखमी आहेत. ही घटना ईमामपूर रस्त्यालगतच्या पुलाजवळ झाली.
औरंगाबादहून सोलापूरकडे निघालेला (एचआर ३८ टी- ५७५७) व सोलापूरहून औरंगाबादकडे जाणारा (टीएन ३० यू-४५४२) या दोन मालवाहू ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला. (टीएन ३० यू-४५४२) या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. (एचआर ३८ टी- ५७५७) या ट्रकमधील दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातसची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मृत अश तिघांनाही जिल्हा रुग्णालयात आणले. मृताची ओळख अद्याप पटली नसून इतर दोघांवर उपचार सुरु आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *