👁 11 Views

पंढरपूरातील रस्त्यांच्या कामांबाबत 15 दिवसात चौकशी अहवाल द्या -विभागीय आयुक्त दळवी यांचे अधीक्षक अभियंता यांना आदेश


पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018
पंढरपूरातील रस्त्यांच्या कामांबाबत 15 दिवसात चौकशी अहवाल द्या 
विभागीय आयुक्त दळवी यांचे अधीक्षक अभियंता यांना आदेश

            सोलापूर दि. 12 : – तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपुरात केल्या  जाणा-या रस्त्यांच्या कामाला होणारा विलंब, कामाची गुणवत्ता आणि इतर विविध प्रकारच्या  तक्रारीबाबत चौकशी करुन  पंधरा  दिवसात अहवाल सादर करावा,  असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलापूरचे अधिक्षक अभियंता यांना दिले.
            पंढरपूरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून  एकूण 12 रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यापैकी आठ रस्त्यांची कामे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाअभियान  अंतर्गत नगरपरिषदेमार्फत सुरु आहेत व इतर चार कामे तीर्थक्ष्‍ोत्र विकास आराखड्यातून केली जात आहेत. या कामांची गुणवत्ता, युटीलिटी शिफटींग न करता कामे होत आहेत, विविध कार्यान्वयीन यंत्रणा यामध्ये असलेला समन्वयाचा अभाव यामुळे कामास होणारा विलंब अशा तक्रारी विभागीय आयुक्तांकडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे आढावा बैठक घेतली.  या बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी  कामाची चौकशी करुन 15 दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.
            नगरपरिषदेच्या वतीने सुरु असलेल्या आठपैकी सहा रस्त्यांची कामे  सुरु असून दोन रस्त्यांची कामे अद्याप सुरु नाहीत तर  तीर्थक्षेत्र  विकास आराखड्या अंतर्गतची रस्त्यांची चार कामे प्रगतीपथावर आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *