👁 9 Views

पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी

पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात दि. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. ‘‘राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या अंगी असलेला करारी बाणा व राष्ट्राभिमान प्रत्येक स्त्रीनं अंगीकारावा. सन्मानानं, स्वतंत्र जगण्यासाठीचा व स्वराज्याप्रती निष्ठा व त्याग फुलवण्याचा राजमातेनं दिलेला संदेश आपल्या मुलांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न सर्व महिलांनी करावा.”  असे मत यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी व्यक्त केले.
 यावेळी नगरसेविका सौ. सारिकाताई राहुल साबळे व सौ. मिनाक्षीताई भोसले, पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे व पंढरपूर लाईव्ह परिवारातील सदस्य उपस्थित होते.   

विनंतीला मान देऊन पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले या आवर्जुन उपस्थित राहिल्या याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व उपस्थित सर्वांचे आभार मानले. नगरसेविका सौ. सारिकाताई साबळे व सौ.मिनाक्षीताई भोसले यांचा सत्कार नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांचे हस्ते करण्यात आला. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *