पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
अंबाजोगाई सञ न्यायालयाचा निकाल…
परळी वै :- येथील अल्पवयीन युवतीस हात धरून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एक जणास अंबाजोगाई येथील अति.सञ न्यायालयाचे न्या.एस.व्ही.हांडे यांनी सात वर्ष सक्तमजुरीची व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 16.10.2015 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातील एका खेडेगावतील महाविद्यालयीन तरूणी महाविद्यालय संपल्यावर परळी बसस्टँडकडे जात असतांना इंजेगाव येथील वंसत बब्रुवान कराड यांने मोटारसायकलीवरून तिचा पाठलाग करून बसस्टँन्डजवळ तिच्या जवळ जावुन तिचा हात जबरदस्तीने धरून गाडीवर बसण्यास सांगितले व विनयभंग केला वगैरे मजकुरावरून परळी शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.232/15 गुन्हा कलम 354 (अ) 354 (ड) व गुन्हा कलम 8 व 12 बालकांचे लैंगीक अत्याचार विरोधी कायदा 2012 (पोस्को)अन्वये आरोपीविरद्ध गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्हयाचा तपास परळी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी करून अंबाजोगाई येथील अति.सञ न्यायालयात दोषारोपपञ दाखल केले होते.न्यायालयात साक्षीपुरावा होऊन वसंत बब्रुवान कराड यास गुन्हा कलम 354 (अ)भा.दं.वि खाली दोन वर्षाची सक्तमजुरी व गुन्हा कलम 354(ड) भा.दं.वी खाली तीन वर्ष सक्तमजुरी व गुन्हा कलम 10 पोस्को खाली 7 वर्ष सक्तमजुरीसव गुन्हा कलम 12 पोस्को खाली 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच रू 5 हजार दंडाची शिक्षा ठोठावली.दंडाच्या रक्कमेतुन रू 3 हजार पिडीत फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणुन देण्याचा आदेश दिला. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी आभियोक्ता अँड.लक्षमण फड यांनी काम पाहिले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com




