👁 8 Views

मकरसंक्रांतीचं महत्व… “तीळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला!”

पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018

भारत देशातील संस्कृतीमध्ये सणांना खुप महत्व आहे. थंडीच्या दिवसातील पहिला-वहिला सण म्हणजेच मकरसंक्रांतीचा सण होय. मकरसंक्रांती ही दर वर्षी 14 जानेवारी रोजी येते. 14 तारखेच्या आधीची रात्र मोठी तर दिवस लहान असतो. मकरसंक्रांतीदिवशी मात्र दिवस आणि रात्र समान असतात. यानंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. संक्रांतीनंतर ॠतुबदल होण्यास प्रारंभ होतो. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरु होते. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हणतात. यादिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. बाजरी शरीरास उष्णता प्रदान करते, यादिवशी ऊस, बोरं, तिळ-गुळ, ओला हरभरा यासोबत  विविध प्रकारच्या भाज्या एकत्रीत करुन एक आगळी-वेगळी भाजी तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाण्याची परंपरा आहे.

सुर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. मकरसंकेांतीच्या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांती असं म्हणतात. हिंदु संस्कृतीमधील हा एकमेव सण आहे की, जो 14 जानेवारी या तारखेलाच येतो. याचे कारण म्हणजे हा सण सुर्याच्या स्थानावर आधारलेला असतो. सुर्यभ्रमण हे दर आठ वर्षातून एकदा बदलत असते, त्यावेळी मात्र हा सण 15 जानेेवारी रोजी येतो. 2016 मधील मकरसंक्रांत 15 जानेवारी रोजी होती.

तीळ गुळ घ्या गोड-गोड बोला..!
या सणाला तीळगुळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मकरसंक्रांतीला तीळ आणि गुळाचे लाडू अथवा वड्या करण्याची पध्दत आहे. आपल्या आयुष्यातील जुन्या कडु आठवणींना विसरुन आयुष्यात तीळगुळासारखा गोडवा भरण्यासाठी एकमेकांना तीळ-गुळ वाटप करुन “तीळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला!” असं म्हटलं जातं. तसंच आमचा तीळ सांडु नका आणि आमच्याशी कधी भांडु नका..! असंही म्हणत एकमेकांना जिव्हाळ्यानं गळाभेट घेऊन प्रेमाचं नातं जपलं जातं.

हा सण भारतासोबतच नेपाळ (माघी संक्रांत), थायलंड (सोंग्क्रान), लाओस (पी मा लाओ), आणि म्यानमार (थिंगयान) अशा नावाने या देशांमध्ये साजरा केला जातो. गुजरात आणि राजस्थानमध्ये या सणादिवशी पतंग उडविण्याची पध्दत आहे.

आपल्या महाराष्ष्ट्रात मकरसंक्रांतीला सुवासिणी महिला एकमेकींना हळदी-कुंकवाचे ‘वाण’ देतात. लहान लहान मातीच्या मडक्यांना ‘ओवासणे’ घालतात. हा सण विशेषत: महिला-भगिणींसाठी महत्वाचा सण असतो.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *