👁 5 Views

लोकमान्य विद्यालयात योग प्राणायाम शिबीर संपन्न


पंढरपूर LIVE 14 जानेवारी 2018
लोकमान्य विद्यालयात योग प्राणायाम शिबीर संपन्न :- पंढरपूर नगरपरिषद व योग विद्दाधाम यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य विद्यालय पंढरपूर येथे योग व प्राणायाम शिबीर पार पडले. नगरपरिषद शिक्षण समिती चे नूतन सभापती श्री विवेक परदेशी यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष श्री नागेशजी भोसले यांच्या हस्ते झाले व पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री सुनील वाळूजकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
       या कार्यक्रमात योग विद्दाधाम चे योग शिक्षक श्री अशोक ननवरे यांनी विद्यार्थाना ओंमकार,  प्राणायाम , सूर्यनमस्कार  तसेच योगासनांची प्रत्येक्षिक दाखवली .  सर्व योगासनांची शास्त्रोक्त माहिती देऊन ती विध्यार्थाकडुन करुन घेतली. श्री विष्णु देठे यांनी सूर्यनमस्कार, तसेच योगासनांची आर्दश प्रत्येक्षिक दाखवली. 
 या शिबीरच्या आयोजनात संदर्भात भूमिका स्पष्ठ करताना नगरपरिषद शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विशेषतः शारीरिक विकसासाठी योग व प्राणायाम चा फायदा होतो, खेळ आणि व्यायमामुळे आरोग्य सुधारते असे सांगितले. त्याच बरोबर पंढरपूरातील सर्व विद्यार्थासाठी येत्या २४ जानेवारी ला रथसप्तमी तसेच जागतिक सूर्यनमस्कार दीना निमित्त जिजामाता उद्यान येथे सकाळी ६.३०  वाजता सूर्यनमस्कार प्रशिक्षनाचे आयोजन केले आहे . त्यामध्ये पंढरपुरातील सर्व विध्यार्थी व तरुण नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विवेक परदेशी यांनी केले. याप्रसंगी बोलताना श्री नागेशजी भोसले म्हणाले की शालेय जीवनात व्यायामाची आवड निर्माण झाली तर ती आयुष्यभर टिकते. न.प.उपमुख्याधिकारी श्री सुनील वाळूजकर यांनी योग व प्राणायाम चे महत्व सांगताना मी स्वतः नियमित सराव करत असल्याने मला खूप फायदा झाल्याचे सांगितले. 
    या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे पालवी संस्थेचे विद्यार्थानी या शिबीरात उत्फुत सहभाग घेतला होता. त्यासाठी शिक्षण समिती सभापती श्री विवेक परदेशी यांच्या तर्फे वाहन व्यवस्था करण्यात आली होती. पंढरपूर बॅटमिंटन अकॅडमी प्रशिक्षक आणि विध्यार्थानी शिबीरात उत्फुत सहभाग घेतला. लोकमान्य विद्यालयाचे परिवेक्षक श्री अभय अराध्ये तसेच सर्व शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी, तंत्रशिक्षक विध्यार्थी मोठ्ठा संख्येने उपस्थिय होते. 
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोवर्धन भुट्टड,आशिष शहा, शाहूराजे जाधव ,अजिंक्य जाधव , श्रीपाद परदेशी, तुषार मुळे, लोकमान्य शाळेचे सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक श्री डिंगरे एस.एच. यांनी सर्वांचे स्वागत केले व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती साखरे यांनी सर्वांचे आभार मानले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *