👁 5 Views

ध्वनी प्रदुषणाच्या कारणावरुन हॉटेल ऐश्‍वर्या येथील महाकाय जनरेटर हटविण्याचे प्रांताधिकार्‍यांचे आदेश

पंढरपूर LIVE 14 जानेवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील नामांकीत हॉटेल ऐश्‍वर्या मध्ये वापरण्यात येत असलेल्या जनरेटरमुळे होत असलेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत हॉटेलच्या शेजारी रहाणारे डॉ.विनय भोपटकर यांनी अ‍ॅड. इंद्रजीत परिचारक व अ‍ॅड. ओंकार बुरकुल यांच्यामार्फत पंढरपूर येथील उपविबागीय अधिकारी यांच्याकडे फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत प्रचंड प्रमाणात होत असलेले ध्वनीप्रदुषण बंद होऊन मिळणेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता. 
यात हकीकत अशी की, हॉटेल ऐश्‍वर्या यांचे हॉटेल व लॉजसाठी वापरण्यात येत असलेल्या महाकाय जनरेटरचा आवाज व कंपन (व्हायब्रेशन) इतके मोठे होते की, यातील तक्रारदार यांचे दवाखान्यात येणार्‍या रुग्नांना काहीही ऐकू येत नव्हते व डॉक्टरांना रुग्णांशी बोलता देखील येत नव्हते. हॉटेल ऐश्‍वर्याचे मालक महावीर गांधी यांना अर्जदार यांनी विनंती करुन देखील गांधी यांनी जनरेटरमुळे होत असलेल्या ध्वनीप्रदुषणाबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने अर्जदार यांना उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करणे भाग पडले होते. याप्रकरणी मा. उपविभागीय अधिकारी यांनी पंढरपूर येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच शहर पंढरपूर येथील पोलिस निरीक्षक यांना वस्तुस्थितीचा अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांनी सादर केलेला अहवाल तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे व सादर केलेल्या पुराव्याचा विचार करुन मा. उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांनी अंतरिम निर्णय देवून हॉटेल ऐश्‍वर्यामधील महाकाय जनरेटर सध्या असलेल्या जागेतून दोन महिन्यात हलविण्याचे व तोपर्यंत जनरेटर बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
याप्रकरणी अर्जदार तर्फे अ‍ॅड. इंद्रजीत परिचारक व अ‍ॅड. ओंकार बुरकुल यांनी तर  गैरअर्जदार तर्फे अ‍ॅड. चौंडावार यांनी काम पाहिले आहे.  

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *