👁 4 Views

मुस्लिम खाटीक व मागासांना एस.सी. चे आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादीने राज्य , राष्ट्रीय स्तरावर पुढाकार घ्यावा!

पंढरपूर LIVE 20 Jun 2018

               इस्लामपूर /   आटपाडी दि .२० ( प्रतिनिधी )               मुस्लीम खाटीक व इतर मुस्लीम मागासांसाठी केंद्राने घटनादुरुस्ती करून धर्मांतरीत मुस्लीम मागासांना अनुसूचित जातीची ( एस.सी. ) सवलत द्यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केंद्र आणि राज्यस्तरावर निकाराचे प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष , माजी मंत्री , आमदार जयंतराव पाटील यांना देण्यात आले .           राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य , मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी यांनी समाज बांधवांच्या वतीने सदरचे निवेदन आमदार पाटील यांना दिले .              


स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी ३० एप्रील १९३६ रोजी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले होते की , भारतातील खिश्वन आणि बंगालचे बौद्ध यांना सोडून इतर मागास जातींना धर्माचे बंधन न ठेवता अनुसूचित जातीच्या सवलती देण्यात येतील . या आदेशामुळे मुस्लीम खाटीक व इतर मुस्लीम मागासांना एस.सी. च्या सवलती १४ वर्षे मिळाल्याही . मात्र स्वातंत्र्यानंतर अध्यक्षीय अध्यादेश १९५० साली निघाला आणि एस. सी. च्या सवलतींसाठी हिंदू मागास असणे अनिवार्य केले गेले . त्यामुळे मागास मुस्लीमांचा न्याय हक्क डावलला गेला . देशातील हिंदू खाटीक बांधवांना अनुसूचित जातीची सवलत मिळते . मात्र हिंदू खाटीक बांधवांपेक्षा अत्यंत दुरावस्थेला जावून पोहचलेल्या मुस्लीम खाटीक यांनाही अनुसूचित जातीची सवलत मिळणे न्यायाचे आहे .१९५६ आणि १९९० मध्ये केलेल्या घटना दूरुस्तीद्वारे अनुक्रमे मागास शीख आणि नवबौद्ध अनुसूचित जातीची सवलत मिळवू शकले . याच न्यायाने मुस्लीमांतील खाटीक , मेहतर , मोची , यासारख्या अति मागासांसाठी आणखी एक घटना दुरुस्ती केली जाणे महत्वाचे आहे . याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे .                         
  
पुर्वाश्रमीचा माळी हा बागवान झाला .नाभीकाचा हजाम झाला , चांभार मोची झाला .परीट धोबी बनला . याच न्यायाने ज्यांनी ,ज्यांनी धर्म बदलला त्याची पूर्वीची जातच दुसऱ्या धर्मातील त्याची ओळख बनली .विविध आयोग , समिती , संशोधन कमेट्यांंनी आपल्या संशोधनातून हे पूढे ही आणले आहे . हिंदू खाटीकच कसाई झाल्याचे यांनीच ठासून सांगीतले आहे . मग धर्मातरीत महार बांधवांना नवबौध्द झाल्यानंतर एस.सी. ची सवलत पूर्ववत मिळावी म्हणून घटना दूरुस्ती करून पूर्वीचीच एस.सी. ची सवलत पुढेही कायम दिली जाते . मग पुर्वाश्रमीच्या हिंदू खाटीक च असलेल्या धर्मांतरीत कसाई , कसाब , कुरेश , मुस्लीम खाटीक यांच्यासाठी घटनादुरुस्ती करून हिंदू खाटीक बांधवांना दिली जाणारी एस .सी . ची सवलत मुस्लिम खाटीक बांधवांना का दिली जात नाही , याकडे न्यायोचित भूमिकेने पाहणे गरजेचे आहे . मुस्लीम खाटीक बांधवांची अनेक आडनावे ( कांबळे , आदमाने , कोथमिरे, खडके, भातनावे , घोडके, शहाजी, सव्वालाखे , जाधव, सदावर्ते, धारूरकर, चोरभोर ,राशनकर, धाकपाडे , क्षीरसागर , गोट्याकर, गाडीवान, विजापूरे, रहिमतपूरे , माडी , कल्याणकर , पलंगे, बेंद्रे, बेदरेकर, भैलुनकर, भडाळे , भंडारे, करमाळकर , पन्हाळकर,साठी, पालकर, ताडे, चवधरी, घोणे, गुणे, सदाबडे, बांगर, मस्के, परांडे, नाडेवाले, जानवेकर, कलाल , खाटीक ) पाहील्यास ते पुर्वाश्रमीचे हिंदू खाटीक , दलीत होते हे सिद्ध करण्यासाठी मदतच करतील .                              हिंदू खाटीक बांधव गेली ७० वर्षे एस.सी.च्या सवलती घेतो . मात्र तेच काम करणारा मुस्लीम खाटीक ओबीसीच्या विशाल प्रवर्गात ढकलला गेला आहे . जिथे त्याला हक्काने काही मिळणे फारच मुश्कील झाले आहे.एकाच कर्मासाठी, एकाच व्यवसायातील, दोन वेगवेगळ्या धर्माच्या समाजांना , दोन वेगवेगळे निकष लावणे सर्वतः चुकीचे आहे. सर्व समाजाची जी भावना हिंदू खाटीक यांच्या बाबतीत आहे, तीच भावना मुस्लीम खाटीक यांच्या बाबतीतही आहे . शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत स्वकर्तृत्वाने पुढे आलेले काही लोक सोडले तर संपूर्ण खाटीक समाज आजही दारीद्रयात, अनेक आजारांना बळी पडत चाललेला आणि सामाजीक , आर्थीक , शैक्षणीक दृष्टया व्यवस्थेला *उलटाच* टांगला गेला आहे . मुस्लीम खाटीक समाजाची राजकीय क्षेत्रातील अवस्था पहावी तर हे क्षेत्र जणू त्यांच्यासाठी नसावेच अशी एकंदर स्थिती आहे . शेतीवाडी , गुरं ढोरं, आर्थीक संपन्नता याबाबत तर मुस्लीम खाटीक बांधवांची स्थिती *ढुंढते रह जाओगे* , अशी  असल्याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी या निवेदनात , *केंद्रीय सामाजीक न्याय खात्याचे राज्यमंत्री ना. रामदास आठवले साहेबांनी* *राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दि. १० /१२ /२oo८ रोजी पाठविलेल्या पत्रात मुस्लीम खाटीक , मेहतर , मुक्री , मोची सारख्या मुस्लिम मागासांसाठी घटना दूरुस्ती करून अनुसूचित जातीच्या सवलती देण्यात याव्यात याची शिफारस करून राज्याने, केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवावा असे सुचित केले होते . हे ही आमदार जयंतराव पाटील यांच्या निदर्शनास आणले* *मुस्लीम खाटीक, मुस्लीम मागासांना एस.सी.ची सवलत दिली जावी याचे समर्थन अनेक आमदार , खासदार ,यांनीही केल्याचे या निवेदनात    स्पष्ट केले असून ३५ हुन अधिक आमदार, खासदार यांच्या पत्राच्या झेरॉक्स प्रती जोडल्याचे स्पष्ट केले आहे*                 *दरम्यान काही दिवसा पूर्वी पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजीक न्याय खात्याचे राज्यमंत्री ना . रामदास आठवले यांनी मुस्लिम खाटीक , मुस्लीम मागासांना अनुसूचित  जातीची सवलत देण्यासाठी केंद सरकारने घटना दुरुस्ती  करावी यासाठी केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवावा . यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांना ते खासदार असताना दि. १०डिसेंबर २००८ रोजी पाठविलेल्या त्यांच्या पत्राची आठवण त्यांना करून देण्यात आली. मुस्लीम खाटीक ,मागासांना अनूसूचित  जातीची सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने घटना दुरुस्ती करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा याबाबतचे विनंती करणारे निवेदन त्यांनाही देण्यात आले*. 
महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *