👁 10 Views

परिश्रमाशिवाय यश नाही-आमदार दत्तात्रय सावंत ”स्वेरीत तीन संघटनांतर्फे गुणवंतांचा सन्मान”

पंढरपूर LIVE 25 Jun 2018

पंढरपूर- जीवनातील यश हे मनाच्या समाधानावर आहे, पैशावर नाही आपले ज्ञानाचा वापर हा समाजासाठी करावा. आजपर्यंत यश मिळविलेली माणसे पहिली तर त्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यांच्या त्यांनी पाठलाग केला आणि यशस्वी झाले आहेत यासाठी मोठी स्वप्ने पूर्ण करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. परिश्रम करताना संघर्ष देखील करावा लागतो याचे भान असले पाहिजे. स्वतःचा विकासाबरोबरच समाजाचा देखील विकास झाला पाहिजे. आज स्वेरीचे नाव आवडीने घेतले जाते याचे कारण म्हणजे प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेले परिश्रम आणि त्याला आलेले यश हे अत्यंत दुर्मिळ व महत्वाचे असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यातच रोंगे सर समाधान मानतात आणि याच उदात्त धोरणामुळे स्वेरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अव्वल राहिले आहे. एकूणच प्रत्येक क्षेत्रात परिश्रम केल्याशिवाय यश मिळणार नाही हे मात्र नक्की.’ असे उदगार शिक्षक आमदार  दत्तात्रय सावंत यांनी काढले.
              येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील वातानुकुलीत आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदपंढरपूरपंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीत आयोजिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दत्तात्रय सावंत मार्गदर्शन करत होते. अध्याक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील होते. तालुका अध्यक्ष दिलीप पवार यांच्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी जि.प. सदस्या शैला गोडसे म्हणाल्या की, ‘ शिक्षणात आता स्पर्धा वाढली असून प्रवाहात वाहण्यासाठी जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते.’ असे सांगितले. जय अॅकॅडमीचे आसिफ यत्नाळ म्हणाले की, ‘आपल्यातील बौद्धिक पातळीचा समाजाच्या विकासासाठी कसा वापर करता येईल हे पहात असताना शिक्षणाचा स्तर देखील उंचावण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलमध्ये मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडे अधिक ज्ञान मिळते यासाठी त्यांच्या सानिध्यात राहून अभ्यास करावा.तेच खरे आपले पहिले मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्या आजूबाजूला चाललेल्या गाव पातळीजिल्हा पातळी व राज्य पातळीवरील घडामोडीचा अभ्यास करावा.याचा वाढत्या ज्ञानाबरोबरच स्पर्धा परीक्षेत देखील फायदा होतो.स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘करिअर करण्यासाठी जे आवश्यक आहे ते तर केलेच पाहिजे परंतु माझ्या अभ्यासानुसार जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी हे आनंदातून लवकर बाहेर पडत नाहीत त्यामुळे पुढच्या शिक्षणात कमी मार्क मिळतात यासाठी त्यांनी मिळविलेल्या आनंदाने हुरळून न जाता पुढील अभ्यासाची तयारी करावी तरच ठरविलेल्या यशाला गवसणी घालता येईल.’ प्रा. यशपाल खेडकर यांनी स्वेरीची वाटचाल सांगून विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडविले जाते याची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना पाटील म्हणाले की, ‘अवघड परिस्थितीचा जास्त बाऊ न करता अथक परिश्रम करून यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तर होतच असतो परंतु अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत देखील यश मिळविता येतेआणि मिळालेल्या संघर्षपूर्ण यासच आनंद काहीऔरच असतो यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे.’ यावेळी १० वी व बारावी परीक्षेतील अविस्मरणीय यश मिळविलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा आमदार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी टाळ्यांचा अक्षरशा पाऊस पडत होता. यावेळी वेनुनगरच्या विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य आर डी. पवार यांचे सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी पूजा पाटीलभारुडकार चंदाताई तिवाडीसंभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगेबाळासाहेब बागलसंजय जाधवउत्तम जमदाडेमुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शेंडगेपंजाबराव देशमुख शिक्षक संघाचे पुंडलिक पवार, जिल्हा संघटक रणजीत जगतापसौ. सुमन पवारसमाधान घाडगेअरुण फाळकेविठ्ठल देवकर,प्रसाद सातपुतेनितीन जाधवहरिदास फाळकेहनुमंत भोसलेभरत पाटील मोरे आदी उपस्थित होते. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

   


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *