👁 9 Views

पंढरपूरमध्ये हटकर समाज बांधवांची बैठक आनंदी वातावरणात संपन्न… हटकर समाजातील मान्यवरांचा सत्कार व संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी!

पंढरपूर LIVE 26 Jun 2018

   
पंढरपूर (लिंगेश भुसनर यांचेकडून):- हटकर समाज बांधवांची बैठक हटकर समाज मठ, माहवीर नगर, पंढरपूर येथे आनंदी वातावरणात संपन्न झाली. या वेळी हटकर समाज संघटनेच्या नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच समाजातील प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकार्‍यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. वै. रामभाऊ भुसनर व कै.शामराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णा अप्पा कवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी दत्तात्रय चौगुले,  विठ्ठल महाराज, आण्णासाहेब भुसनर, सुरेश पाटील, विजय भुसनर, चांगदेव यमगर, तानाजी खोत, बिभीषण बंडगर, दर्लिंग भुसनर, सुसेन भुसनर, चंद्रकांत नायकुडे, व अनेक समाजबांधव उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या विविध भागात प्रशासकीय सेवेत अधिकारी असलेले व विविध क्षेत्रात यश संपादन केलेले हटकर समाजातील मान्यवर नितीन कवले (कामगार आयुक्त), संभाजी मिस्कर (विक्री कर अधिकारी), मारुती सोपनर (केंद्रीय पोलीस), तुकाराम भुसनर (महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त), दाजी पाटील (महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कारप्राप्त), प्रा. शत्रुघ्न भुसनर (पी.एच.डी. साठी राजस्थान निवड), फुलचंद निळी (एस.आर.पी. मध्ये निवड) यांचा सत्कार यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आला.  

यावेळी हटकर समाज संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी विनायक अरुण पाटील, लिंगेश भुसनर (जिल्हा प्रसिध्दीप्रमुख), अर्जुन यमगर (जिल्हा संपर्क प्रमुख), विराट भुसनर (पंढरपूर तालुका युवा अध्यक्ष) यांच्या निवडी करण्यात आल्या. समाजाच्या हितासाठी कार्यरत राहून समाजातील बेरोजगार तरुण, वंचीत शोषीतांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहून अशी ग्वाही नुतन पदाधिकार्‍यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव भुसनर यांनी केले तर तुकाराम भुसनर यांनी आभार मानले. 


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *